रायपूर – छत्तीसगडमधील एका विचित्र घटनेमध्ये आठ वर्षांच्या मुलाने कोब्रा जातीच्या अत्यंत विषारी समजल्या जाणार्या सापाचा चावा घेतला. यानंतर सापाचा मृत्यू झाला. राजधानी रायपूरपासून अनुमाने ३५० कि.मी. अंतरावर असलेल्या जसपूर जिल्ह्यामधील पंढरपेढ या दुर्गम भागातील एका गावामध्ये या मुलाच्या हाताला सापाने विळखा घातला.
आठ वर्षांच्या मुलाने घेतला कोब्राचा चावा; कोब्रा सापाचा मृत्यू, चावा घेणारा मुलगा ठणठणीतhttps://t.co/aOc4IJlVkp
पहिल्यांदाच असा प्रकार आमच्या जिल्ह्यात घडल्याचा दावा एका ज्येष्ठ पत्रकाराने केला आहे#cobra— LoksattaLive (@LoksattaLive) November 4, 2022
त्यानंतर या मुलाने सापापासून सुटका करून घेण्यासाठी सापाचा चावा घेतला. त्यात सापाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दीपकला जवळच्या आरोग्य केंद्रावर नेण्यात आले. तेथे त्याला औषध देण्यात आले आणि दिवसभर देखरेखीखाली ठेवण्यात आले, असे या आरोग्य केंद्रातील डॉक्टर जेम्स मिनीज यांनी सांगितले. दीपकला विषबाधा झाल्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती.