इंग्लंडमधील लेस्टर येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केल्याचे प्रकरण
लंडन – हिंदुविरोधी आणि धर्मांध मुसलमानांविषयी सहानुभूती बाळगणारे लेस्टर विश्वविद्यालयाचे सहप्राध्यापक डॉ. क्रिस एलन यांच्यावर इंग्लंडमधील लेस्टरमध्ये हिंदुविरोधी हिंसेचे स्वतंत्र अन्वेषण करण्याचे दायित्व सोपवण्यात आले होते. ही गोष्ट समोर आल्यावर लेस्टर येथील १५ हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नगरसेवक यांनी यास तात्काळ तीव्र विरोध दर्शवला. सामाजिक माध्यमांतूनही यास मोठ्या प्रमाणात विरोध झाला. त्यामुळे प्रा. एलन यांनी अन्वेषणाचे दायित्व नाकारले.
१. लेस्टरचे महापौर पीटर सोलस्बी यांनी या हिंसेचे अन्वेषण करण्यासाठी एलन यांची नियुक्ती केली होती. त्याआधी सोलम्बी हे हिंदूंच्या विरोधात दंगल भडकावणार्या माजिद फ्रीमॅन यांना भेटले होते. या भेटीलाही मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता.
२. महापौर सोलम्बी यांनी आता म्हटले आहे की, सर्व पक्षांना अनुकूल अशा व्यक्ती अथवा संघटनेकडे घटनेचे अन्वेषण सोपवण्यात येईल.
३. लेस्टर हिंसेवरून प्रा. एलन यांनी सप्टेंबर मासातच ‘द कन्वर्झेशन’ या नियतकालिकात एक लेख लिहिला होता. त्यामध्ये त्यांनी लेस्टर हिंसेमध्ये मुसलमानांना निर्दोष असल्याचे ठरवत हिंदूंवरच हिंसा भडकवण्याचा आरोप केला होता. यास केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटनाच नव्हेत, तर अनेक प्रतिष्ठित पत्रकारांनीही विरोध केला होता. ‘द डेली टेलीग्राफ’चे स्तंभलेखक निक टिमोथी यांनी लिहिले होते की, लेस्टर हिंसेचे अन्वेषण डॉ. क्रिस एलन यांना देणे, ही पुष्कळ मोठी चूक आहे. एलन यांच्या लिखाणावरून त्यांनी आधीच हिंसेविषयी त्यांचा निष्कर्ष काढला आहे.
काय आहे लेस्टर हिंसा प्रकरण ?
२८ ऑगस्ट २०२२ या दिवशी ब्रिटनमध्ये झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यानंतर ६ सप्टेंबरला उद्दाम पाकिस्तानी मुसलमानांनी लेस्टरमध्ये हिंदूंवर आक्रमण केले होते. नंतर १८ सप्टेंबरला धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना लक्ष्य केल्यावर हिंदूंनीही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी हिंदूंच्या एका मंदिरावरील भगवा ध्वज काढून तो जाळण्यात आल्याचा एका व्हिडिओही समोर आला होता.
The letter I sent to Sir Peter Soulsby today – Dr Allen has now rightly gone pic.twitter.com/LvXKDD36cq
— Neil O’Brien MP (@NeilDotObrien) November 1, 2022
संपादकीय भूमिका
|