तेलाच्या टँकरमधून गोवंशांची तस्करी !

सिंहभूम (झारखंड) येथून २३ गोवंशांची सुटका : दोघांचा मृत्यू

सिंहभूम (झारखंड) – पोलिसांनी येथे एका तेलाच्या टँकरची तपासणी केली असता त्यात गोवंश कोंबून भरण्यात आल्याचे उघडकीस आले. यात एकूण २३ गोवंश सापडले. यातील दोघांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला होता. हा टँकर बंगाल येथे जात होता. पोलिसांनी टँकरचा चालक शेख मेराज याला अटक केली आहे. पोलिसांनी यातून जप्त केलेले गोवंश गोशाळेच्या स्वाधीन केले आहेत. या तपासणीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. गोतस्करीसाठी या टँकरच्या रचनेमध्ये पालट करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

देशभरात विविध राज्यांत प्रतिदिन गोवंशियांची हत्या आणि त्यांची तस्करी होत असतांना केंद्र सरकारने गोवंश हत्या बंदी कायदा करावा, अशी गोप्रेमी आणि धर्मप्रेमी यांची अपेक्षा !