१. श्री. प्रीतेश एन्.आर्. (अध्यक्ष, वन्दे मातरम् ट्रस्ट), चिक्कमगळुरू, कर्नाटक.
अ. ‘रामनाथी आश्रमातील वातावरण दैवी आहे.
आ. मी ध्यानमंदिरात असतांना माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले.’
२. अधिवक्ता शैलेंद्र गोपी नाईक, अडपई, गोवा.
अ. ‘रामनाथी आश्रमात आल्यानंतर प्रत्येक वेळी अधिकाधिक शिकण्याची आणि आश्रम पहाण्याची माझी जिज्ञासा वाढते. प्रत्येक वेळी येथील ऊर्जा वाढलेली असते.
आ. ‘मी मंदिरात आलो असून येथे अधिक वेळ थांबावे’, असे मला वाटते.’ (१७.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार मान्यवरांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |