दुर्ग (छत्तीसगड) येथे बालकांच्या चोरीची अफवा : तीन साधूंना बेदम मारहाण !

दुर्ग (छत्तीसगड) – येथे तीन साधूंना मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सामाजिक माध्यमांवर बालकांच्या चोरीची अफवा पसरल्यानंतर जमावाने या साधूंना बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले. पल्लव यांनी दिलेल्या माहितीनुसार हे संपूर्ण प्रकरण दुर्गमधील भिलाई-३ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले.

१. काही कारणास्तव तिघे साधू रस्ता चुकले आणि भिलाई-३ च्या  वस्तीत पोचले.

२. स्थानिक लोकांनी त्यांना थांबवून त्यांची चौकशी केली; मात्र चौकशी चालू असतांनाच लोकांनी तिन्ही साधूंना बेदम मारहाण केली.

३. लोकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, तसेच कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या साधूंवर आक्रमणे होण्याच्या घटना वाढत असल्याने यामागे कोणते षड्यंत्र तर नाही ना, याचे अन्वेषण होणे आवश्यक !