‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा देणार्‍यांचे भारतीय नागरिकत्व रहित करावे ! – विक्रम पावसकर

हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात निवेदन !

पोलीस निरीक्षक बी.आर्. पाटील यांना निवेदन देतांना श्री. विक्रम पावसकर, तसेच अन्य

कराड, २६ सप्टेंबर (वार्ता.) – कोंढवा, पुणे येथे पी.एफ्.आय. या (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेच्या कार्यालयावर धाड टाकून काही व्यक्तींना अटक करण्यात आली. त्या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा देण्यात आल्याचे वृत्त विविध प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले आहे. तरी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांचे भारतीय नागरिकत्व रहित करावे, तसेच त्यांच्या विरोधात देशद्रोहाचे कलम लावून कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा हिंदु एकता आंदोलनचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली कराड शहर पोलीस निरीक्षक बी.आर्. पाटील यांना देण्यात आले.

या प्रसंगी यातील दोषींची घरे पाडण्यात यावीत, अशीही मागणी करण्यात आली. या वेळी सर्वश्री रूपेश मुळे, ओंकार पावसकर, प्रकाश जाधव, भाजपचे शहराध्यक्ष श्री. एकनाथ बागडी, श्री. विश्वनाथ फुटाणे, वहागावचे सरपंच श्री. संग्राम पवार, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सागर आमले, श्री. अनिल खुंटाळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोहर जाधव आणि श्री. मदन सावंत, तसेच हिंदु एकता आंदोलनचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.