पुणे, संभाजीनगर आणि जालना या ३ शहरांत गुप्तचर यंत्रणेकडून सतर्कतेची चेतावणी !

‘तबलिगी जमात’ आणि ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या जिहादी संघटनांनी स्वतःचे केंद्र बनवले !

मुंबई – ‘तबलिगी जमात’ आणि ‘जमियत उलेमा ए हिंद’ (जे.यू.एच्.) या   संघटनांनी पुणे, संभाजीनगर आणि जालना शहरांत स्वतःचे केंद्र बनवले आहे. या संघटनांच्या वतीने जालना आणि संभाजीनगर येथे सदस्य नोंदणी करण्यात येत आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांकडून सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. या संघटना अत्यंत गुप्त पद्धतीने आखणी करत आहेत, ज्यामुळे विघातक कारवायांचा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.ने) अमरावती येथील उमेश कोल्हे यांची जिहाद्यांनी केलेल्या हत्येच्या प्रकरणी आरोपींची चौकशी करतांना ‘तबलिगी जमात’ आणि ‘जमियत उलेमा ए हिंद’ या संघटनांविषयी वरील माहिती मिळाली.

परदेशातून मिळतो पैसा !

या वादग्रस्त संघटनांचे ३ लाख ‘फॅमिली अकाऊंट’ आहेत. या खात्यांमध्ये फॅमिली मेन्टेनन्सच्या नावाखाली कतार, कुवैत, बहरीन आणि सौदी अरेबिया या देशांतून ५०० कोटी रुपये आले आहेत, अशी माहिती ‘एन्.आय.ए.’च्या सूत्रांनी दिली आहे. ही रक्कम ‘मनी ट्रान्सफर’च्या माध्यमातून वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवण्यात आली आहे. या खात्यांपैकी १ लाख खाती संघटनेच्या सदस्यांची, तर उरलेली २ लाख खाती त्यांचे नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्ती यांची आहेत. या खात्यांमध्ये येत असलेल्या पैशांचा वापर कशासाठी होत आहे, याचे अन्वेषण ‘एन्.आय.ए.’ करत आहे.

संपादकीय भूमिका

यंत्रणांनी केवळ सतर्कतेची चेतावणी देणे पुरेसे नसून या जिहादी संघटनांची पाळेमुळे नष्ट करून जनतेला आश्‍वस्त करणे आवश्यक आहे !