पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना जर्मनीत विमानातून उतरवले !

मुख्यमंत्री दारूच्या नशेत असल्याचा दावा

पंजाबमधील आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान

नवी देहली – पंजाबमधील आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान यांना जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर विमानातून खाली उतरवण्यात आले. मुख्यमंत्री दारूच्या नशेत असल्याचा आरोप केला जात असतांना शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंह बादल यांनी ट्वीट करून मान आणि केजरीवाल यांना याविषयी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. ‘अशा प्रकारच्या वृत्तामुळे जगभरातील पंजाबी लोकांची मान लज्जेनेे खाली गेली’, असे त्यांनी म्हटले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान यांना १७ सप्टेंबर २०२२ या दिवशी जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर लुफ्थांसा एअरलाइन्सच्या विमानातून उतरवण्यात आले. ‘ते दारूच्या नशेत होते. त्यामुळे विमान कंपनीने असा निर्णय घेतला’, असे सांगितले जात आहे. या कारणामुळे विमान ४ घंटे उशिरा देहलीला पोचले.