इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन चालूच

केस कापून, तसेच हिजाब जाळून निषेध !

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

तेहरान (इराण) – इराणमध्ये हिजाबचा विरोध प्रतिदिन वाढत आहे. हिजाबची सक्ती करणार्‍या काही कार्यकर्त्यांमुळे इराणमध्ये महिसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीला मारहाण करण्यात आल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रचंड विरोध होत आहे. तिच्या अंत्ययात्रेच्या वेळी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. इराणी महिला हिजाब काढून टाकत निदर्शने करत आहेत. या महिलांवर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.  या वेळी काही महिला आंदोलकांनी स्वतःचे केस कापून हिजाब फेकून देत त्याला आग लावली. ७ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना हिजाब सक्तीचा करण्याचा कायदा इराण सरकारने केल्याच्या निषेधार्थ ही प्रतिकात्मक आंदोलने ठिकठिकाणी करण्यात येत आहेत.

संपादकीय भूमिका

इराण इस्लामी देश असतांना तेथील मुसलमान महिला हिजाबच्या सक्तीचा विरोध करतात, तर भारत इस्लामी देश नसतांना येथील मुसलमान महिला हिजाबचे समर्थन करतात !