पाकच्या प्रशासनाने पूरग्रस्त हिंदूंना शिबिरांतून बाहेर काढले !

या घटनेचे वृत्त प्रसारित करणार्‍या पाकिस्तानी पत्रकाराला अटक

कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील सिंध प्रांतातील पुरामध्ये अडकलेल्या हिंदूंच्या दुर्दशेविषयी वृत्त प्रसारित केल्याच्या प्रकरणी पाकने नसरल्लाह गद्दानी नावाच्या एका पत्रकाराला अटक केली आहे. त्याला ५ दिवसांच्या पोलीस कोठडीतही ठेवण्यात आले.

गद्दीनी यांनी सिंधच्या मीरपूर मथेलोमधील हिंदूंच्या भागरी समाजातील लोकांच्या  दुर्दशेला वृत्तपत्रातून वाचा फोडली होती. गद्दानी यांनी त्यांच्या वृत्तामध्ये म्हटले होते की, भगरी समजातील लोक हिंदु असल्याने त्यांना स्थानिक प्रशासनाने पूरग्रस्तांसाठीच्या शिबिरातून ‘ते पूरग्रस्त नाहीत’, असे सांगत बाहेर काढले होते. भगरी समाजातील हिंदूंची दुःस्थिती सांगणारा एक व्हिडिओही प्रसारित करण्यात आला होता. यात हिंदू ‘त्यांना प्रशासनाने का बाहेर काढले ?’, याची माहिती देत आहेत.

संपादकीय भूमिका

एकीकडे पाकमधील हिंदू त्यांच्या मंदिरांमध्ये ३०० हून अधिक पूरग्रस्त मुसलमानांना आश्रय देत आहेत, तर दुसरीकडे प्रशासन हिंदूंना शिबिरातून बाहेर काढत आहेत ! यातून पाकिस्तान्यांची मानसिकता लक्षात येते ! सापाला कितीही दूध पाजले, तरी तो गरळच ओकणार, हे हिंदूंना लक्षात येईल तो सुदिन !