१० मुले जन्माला घाला आणि १३ लाख रुपये मिळवा !

रशियाच्या सरकारचे महिलांना आवाहन !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

मॉस्को (रशिया) – कोरोना महामारी आणि त्यानंतर चालू असलेले युक्रेन युद्ध यांमुळे रशियाच्या लोकसंख्येत कमालीची घट झाली आहे. देशातील लोकसंख्येचे संतुलन पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियातील महिलांना आवाहन केले आहे. एखाद्या महिलेने जर १० किंवा त्यापेक्षा अधिक मुलांना जन्म दिला आणि तिची सर्व १० अपत्य जिवंत असतील, तर १० व्या अपत्याच्या पहिल्या वाढदिवशी त्या महिलेला १० लाख रशियन रुबल अर्थात् भारतीय चलनानुसार जवळपास १३ लाख रुपये दिले जाणार आहेत.

रशियातील सुरक्षा तज्ञ जेन्नी माथेर यांनी यासंदर्भात म्हटले की, १३ लाख रुपयांसाठी कोण १० मुलांना वाढवणार ? १० वे अपत्य वर्षभराचे होईपर्यंत ही सर्व मुले आणि त्यांचे कुटुंब रहाणार कुठे ? जगणार कसे ? या सूत्राला अनेक आर्थिक, सामाजिक आणि राजकीय कंगोरे आहेत.