पुणे – देशभरात १४ ऑगस्ट या दिवशी ‘फाळणी दु:खद स्मृतीदिन’ (विभाजन विभिषिका स्मृतीदिन) पाळण्यात येत आहे. त्या निमित्त जिल्ह्यातही विविध ठिकाणी फाळणीबाधित नागरिकांशी संबंधित दु:खद घटना आणि अनुभव यांची माहिती देणार्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेकडून रवि वर्मा गॅलरी आणि फिनिक्स मॉल येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले, तसेच कात्रज येथील कै. य.ग. शिंदे विद्यानिकेतन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत रामकृष्ण मोरे सभागृह, मुख्य टपाल कार्यालय, रेल्वेस्थानक आदी विविध ठिकाणीही हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या निमित्ताने आयोजित होणार्या कार्यक्रमांचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. प्रदर्शनाला विविध शाळेतील विद्यार्थ्यांसह नागरिकांनी भेट दिली. ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर ऑफ आर्ट्स’ने हे प्रदर्शन डिजिटल स्वरूपात सिद्ध केले होते.