स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा !

सांगली – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले. (असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ? – संपादक)
१. जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

२. तासगाव येथे नगर परिषदेत कार्यालयीन अध्यक्षा वर्षा भानुदास कुंडले यांनी, तर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी संजीव झाडे यांनी निवेदन स्वीकारले. तहसील कार्यालयातही निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शिवसेनाप्रणित ‘शिवसामर्थ्य सेने’चे सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री. पुरण मलमे, समितीचे श्री. सचिन कुलकर्णी यांसह अनेक राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.


३. जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांना निवेदन देण्यात आले. शिरोळ येथे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांना, तसेच‘ श्री पद्माराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज’चे प्राचार्य सी.एस्. पाटील यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी सर्वश्री मंदार पाटुकले आणि विनय चव्हाण उपस्थित होते.

४. जत येथे पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सुरेखा पिसाळ, तर तहसील कार्यालयात तहसीलदार जीवन बनसोडे यांना, तसेच ‘रामराव विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज’मध्ये निवेदन देण्यात आले.

५. मिरज येथे प्रांताधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार नारायण मोरे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शिवसेना व्यापारी सेनेचे सर्वश्री पंडित (तात्या) कराडे आणि पराग नाईक, बजरंग दलाचे मिरज तालुका संघटक श्री. आकाश जाधव, युवासेनेचे श्री. अक्षय मिसाळ, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. विठ्ठल मुगळखोड यांसह अन्य उपस्थित होते.

६. सांगली येथे भाजपच्या नगरसेविका सौ. सुनंदा राऊत यांना निवेदन देण्यात आले.



डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा