भारतीय आणि हिंदु नसलो, तरी भारताचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नरत !

प्रसिद्ध फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांचे ट्वीट

प्रसिद्ध फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए

नवी देहली – मूळचे ख्रिस्ती असलेले प्रसिद्ध फ्रेंच पत्रकार आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. फ्रान्सुआ गोतिए यांनी सनातन धर्माचे महत्त्व प्रतिपादणारे एक ट्वीट केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये, ‘ग्रीक, रोमन, मेसोपोटॅमिया, अजटेक, मयान आणि प्राचीन इजिप्त या संस्कृती लयाला गेल्या; परंतु सर्व प्रकारची आक्रमणे झेलूनही सनातन धर्म केवळ वाचलाच नव्हे, तर आजही शक्तीशाली आहे. त्यांना (हिंदुद्वेष्ट्यांना) हेच आवडत नाही !’, असे लिखाण असलेले छायाचित्र ट्वीट केले आहे.

श्री. गोतिए यांनी या छायाचित्राला उद्देशून ट्वीटमध्ये लिहिले आहे, ‘मी भारतीय नसलो, हिंदु नसलो, तरी पूर्ण शक्तीनिशी भारताचे समर्थन करत आलो आहे. मला हे ठाऊक आहे की, जर हिंदु धर्म नष्ट झाला, तर जगातील ज्ञानाच्या शेवटच्या प्रकाशाचाही अंत होईल आणि मानवता प्रलयाकडे वाटचाल करील. तो जगाचा अंत असेल !’

संपादकीय भूमिका

जे एका पाश्‍चात्त्य विचारवंताच्या लक्षात येते, ते भारतातील कथित हिंदु विज्ञानवादी, विचारवंत, पुरो(अधो)गामी, धर्मनिरपेक्षतावादी यांच्या लक्षात येत नाही, हे लज्जास्पद !