महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी एका साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२१.७.२०२२ या दिवशी फोंडा (गोवा)  येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी एका साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. ‘कार्यशाळेला आरंभ होण्यापूर्वी ‘देव सूक्ष्मातून कार्यक्रमस्थळी आला आहे’, असे मला जाणवले.

२. कार्यक्रमाच्या ठिकाणी मला अकस्मात् पुष्कळ दैवी शक्ती (चैतन्य) जाणवू लागली आणि मला चंदनाचा सुगंध येऊ लागला. ‘या दैवी शक्तीपुढे शरणागतभावाने नतमस्तक व्हावे’, असे मला वाटू लागले. त्या वेळी मला आतून पुष्कळ चांगले वाटत होते.

३. पू. (सौ.) भावना शिंदे आणि पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर यांनी दीपप्रज्वलन केले. त्या वेळी ‘माझा आत्मा तेजाने उजळून निघाला असून माझ्यातील अज्ञानरूपी अंधकार दूर झाला आहे, तसेच भगवंताने या तुपाच्या दिव्याने केवळ माझाच नव्हे, तर प्रत्येक साधकाचा आत्मा उजळून टाकला’, असे मला जाणवले.

४. कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मला भगवंताप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. ‘या कार्यशाळेचा मला अधिकाधिक लाभ घेता यावा’, यासाठी मी भगवंताला प्रार्थना केली.

५. मला येथील वातावरणात, तसेच सहभागी साधकांभोवती पुष्कळ चैतन्य जाणवत होते.

६. कार्यशाळेतील मार्गदर्शनातून मला पुष्कळ शिकायला मिळत होते. ‘मार्गदर्शनाच्या माध्यमातून माझे मन आणि आत्मा यांत चैतन्य ग्रहण होत आहे’, असे मला जाणवत होते.

७. माझे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन मला साधकांविषयी पुष्कळ जवळीक वाटू लागली.’

– एक साधिका (२२.७.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.