रामनाथी आश्रमात वर्ष २०२१ मध्ये झालेले युवा साधना शिबिर
१. आलेल्या त्रासदायक अनुभूती
अ. ‘शिबिरासाठी रामनाथी आश्रमात आल्यापासून माझ्या डोक्याचा आज्ञाचक्रापासून वरचा भाग पुष्कळ दुखत होता. एका संतांच्या सत्संगाच्या वेळी माझ्या या त्रासात पुष्कळ वाढ झाली.
आ. मला मळमळल्यासारखे होऊन उलटी आल्यासारखे वाटत होते.
इ. मला पुष्कळ आळसही येत होता.
२. आलेल्या चांगल्या अनुभूती
अ. दुसर्या दिवशी मला त्रास जाणवला नाही आणि माझे डोकेही दुखले नाही.
आ. मला पुष्कळ आनंद अनुभवायला मिळाला आणि शिबिरातील माझा सहभाग आपोआपच वाढला.
‘गुरुदेवांनी भूवैकुंठातील चैतन्य अनुभवायला दिले’, याबद्दल गुरुमाऊली आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. भक्ती पांगम, सिंधुदुर्ग (१८.११.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |