परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून नामजप करतांना ‘त्यांचे छायाचित्र जिवंत झाले आहे’, असे जाणवणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रातील त्यांच्या आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करून नामजप करू लागल्यावर त्यांच्याछायाचित्रात जिवंतपणा जाणवू लागणे

‘२२.१०.२०२१ या दिवशी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करत होते. त्या वेळी मला ‘परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) छायाचित्राकडे पहात रहावे’, असे तीव्रतेने वाटत होते. मला आध्यात्मिक लाभ मिळण्यासाठी मी उदबत्ती लावली आणि माझ्या समोर रिकामी खोकीही ठेवली. ‘मला आध्यात्मिक लाभ व्हावा’, असे वाटून मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना केली. मी परात्पर गुरुदेवांच्या आज्ञाचक्रावर, म्हणजे त्यांनी कपाळावर लावलेल्या कुंकवाच्या टिळ्याकडे लक्ष केंद्रित करून नामजप करू लागले. काही वेळाने मला परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवू लागला.

२. परात्पर गुरुदेवांच्या आज्ञाचक्रस्थानी अनेक चेहरे दिसू लागणे आणि ते चेहरे पाहून ‘ते सर्व जण साधक कुटुंबातीलच आहेत’, असे जाणवणे

काही वेळाने मी पुन्हा त्यांच्या आज्ञाचक्राच्या स्थानी लक्ष केंद्रित केले आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करू लागले. परात्पर गुरुदेवांच्या आज्ञाचक्रस्थानी मला अनेक चेहरे दिसू लागले. एखाद्या चलचित्राप्रमाणे ते चेहरे एका मागोमाग एक असे दिसत होते. ते चेहरे पाहून मला ‘ते सर्व जण साधक कुटुंबातीलच आहेत’, असे जाणवले. अशी अनुभूती मला प्रथमच आल्याने मी भारावून गेले.

३. परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यानंतर मला त्यांच्या चेहर्‍यात पालट जाणवला. त्यांचा चेहरा तेजस्वी दिसू लागला.

४. परात्पर गुरुदेवांचा खांदा उजवीकडे हलतांना दिसून ते स्वतः छायाचित्रात काहीसे उजवीकडे सरकल्याप्रमाणे जाणवणे

नंतर मी त्यांच्या खांद्यांवर लक्ष केंद्रित केले. तेव्हा त्यांचा खांदा उजवीकडे हलतांना दिसला. मला परात्पर गुरुदेव छायाचित्रात काहीसे उजवीकडे सरकल्याप्रमाणे जाणवले. ‘देव माझ्या समवेत आहे’, याची प्रचीती तोच मला देत आहे’, याची मला जाणीव झाली आणि कृतज्ञतेच्या अश्रूंनी मी त्याच्या पवित्र चरणी एक फूल अर्पण केले.

५. नंतर नामजपादी उपायांच्या वेळेत मी पुन्हा नामजप करण्यास बसले. तेव्हा मला छायाचित्रात परात्पर गुरु डॉक्टर उजवीकडे सरकतांना दिसले.

६. या अनुभूतीने मला पुष्कळ आनंद झाला; परंतु या वेळी मला भारावलेली स्थिती न जाणवता परात्पर गुरुदेवांशी जवळीक जाणवली.’

– एक साधिका (२२.१०.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक