रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले विचार

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम

१. आश्रम पहातांना ‘साधक आपलेच कुटुंबीय आहेत’, असे वाटले !

‘आश्रम पाहून आश्रमात पुष्कळ शक्ती असल्याचे जाणवते. जे या आश्रमात निवास करतात, त्या सर्वांना गुरूंची शक्ती भरपूर प्रमाणात मिळत आहे. मला सर्व साधकांमध्ये ती शक्ती असल्याचे जाणवत आहे. त्यांच्या तोंडवळ्यावर तेज दिसत आहे. आश्रम पहातांना ‘साधक आपलेच कुटुंबीय आहेत’, असे मला वाटले. जशी घरातील एखादी मोठी व्यक्ती लहानांवर चांगले संस्कार करते, तसे येथे आहे. येथे कुणीही शिकवण्याच्या भूमिकेत नसतो. मंदिर, मशीद किंवा चर्च कुठेही जा. ‘येथे देणगी द्यावी’, असा फलक लावलेला दिसतोच; परंतु या आश्रमात एकाही ठिकाणी असे दिसले नाही. ‘जे जे कोणी आश्रमात राहून सेवा करतात, त्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण व्हावी’, अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो.’

– श्री. रवींदर रेड्डी (अध्यक्ष, हिंदु देवालय परिरक्षण समिती, तेलंगाणा.) (१७.६.२०२२)

२. आश्रम पहातांना ‘जणू सर्व देवता आमच्या भारतभूमीला सनातनमय करण्यासाठी येथे उपस्थित आहेत आणि आम्हाला मार्गदर्शन करत आहेत’, असे वाटले !

‘आश्रम म्हणजे जणूकाही चैतन्याचा स्रोतच आहे’, असे वाटले. येथे भेट दिल्यानंतर मी ऊर्जावान होऊन मला कार्य करण्यासाठी शक्ती प्राप्त झाल्याची जाणीव झाली. आश्रमाच्या प्रत्येक ठिकाणी दैवी शक्ती अनुभवता येते. असे वाटते की, ‘जणू सर्व देवता आमच्या भारतभूमीला सनातनमय करण्यासाठी येथे उपस्थित आहेत आणि आम्हाला मार्गदर्शन करत आहेत.’ मी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. घनश्याम शि. व्यास (राज्यप्रमुख, लष्कर-ए-हिन्द, तेलंगाणा), निजामाबाद ५०३००१ (१७.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक