गुरुपौर्णिमेला श्री दत्तरूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेल्या पाद्यपूजनाचे सूक्ष्म परीक्षण !

‘१३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा झाली. तेव्हा सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे पाद्यपूजन केले. देवाच्या कृपेने या दिव्य आणि अभूतपूर्व घटनेचे माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये श्री दत्तगुरूंचे तत्त्व कार्यरत होण्यासाठी सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी श्री दत्तगुरूंचे रूप धारण करणे

कु. मधुरा भोसले

सप्तर्षींनी सच्चिदानंद परब्रह्म यांना सर्व साधकांना श्री दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन देण्यासाठी सांगण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव पुढीलप्रमाणे आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार असून ते पृथ्वीवर धर्मसंस्थापना करण्याचे अवतारी कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी कार्यरत झालेले आहेत. या दिव्य आणि अवतारी कार्याची पूर्तता स्थूल अन् सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म यांच्यामध्ये इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या तिन्ही शक्तींचा संयोग होणे आवश्यक आहे.

१ अ. इच्छाशक्तीच्या बळावर कार्य करणे : जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना भेटतात, तेव्हा प्रतिकूल परिस्थितीमध्येही त्यांच्याकडून होणारे धर्माचरण अन् साधना यांचे प्रयत्न पाहून त्यांच्यावर प्रसन्न होऊन ‘त्यांची आध्यात्मिक उन्नती शीघ्रतेने व्हावी’, असा आशीर्वाद त्यांना देतात. अशा प्रकारे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांची आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने होण्यासाठी इच्छारूपी संकल्पशक्ती कार्यरत होते. त्याचप्रमाणे संपूर्ण समष्टीचे कल्याण होण्यासाठी ‘पृथ्वीवर लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, असाही संकल्प करतात. अशा प्रकारे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर इच्छाशक्तीच्या बळावर अवतारी कार्य करतात.

१ आ. क्रियाशक्तीच्या बळावर कार्य करणे : कालमाहात्म्यानुसार पृथ्वीवर होणारा नैसर्गिक प्रकोप आणि तिसरे महायुद्ध या घोर संकटांपासून पृथ्वीवरील अधिकाधिक मानवजातीचे रक्षण व्हावे, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर प्रयत्नरत आहेत. त्यांच्यातील इच्छाशक्तीमुळे कार्यरत झालेल्या संकल्पामुळेच आज संपूर्ण जगात धर्म आणि अध्यात्म यांचा प्रसार विहंगम गतीने होत आहे. त्यामुळे जगातील अनेक जिज्ञासू, हिंदुत्वनिष्ठ आणि मुमुक्षू साधनेकडे वळून स्वत:चा आत्मोद्धार करून घेत आहेत.

१ इ. ज्ञानशक्तीच्या बळावर कार्य होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या ज्ञानशक्तीच्या संकल्पाने धर्म आणि अध्यात्म यांच्याशी संबंधित सहस्रो ग्रंथांची निर्मिती होत आहे. त्यांच्यातील या ज्ञानशक्तीला अधिक चालना मिळून ही ज्ञानशक्ती संपूर्ण जगात वेगाने प्रवाहित होण्यासाठी सप्तर्षींनी त्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी साधकांना ‘श्री दत्तरूपात’ दर्शन देण्यास सांगितले होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे गोत्र ‘अत्री’ असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून श्री दत्तांचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत होऊन त्यांच्याकडून संपूर्ण विश्वात ज्ञानशक्ती पुष्कळ प्रमाणात प्रवाहित झाली. त्यामुळे सूक्ष्म स्तरावर पुढील परिणाम झाले.

२. श्री दत्तरूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांकडून प्रक्षेपित झालेल्या ज्ञानशक्तीचा विविध लोकांतील जिवांना सूक्ष्म स्तरावर झालेला लाभ

टीप १  : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या श्री दत्तरूपाकडून प्रक्षेपित झालेल्या ज्ञानशक्तीचे प्रमाण

३. सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ  यांनी श्री दत्तरूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची पाद्यपूजा करतांना सूक्ष्म स्तरावर घडलेली प्रक्रिया

टीप १ : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा जागृत झालेला भक्ती/भाव

टीप २ : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या श्री दत्तरूपाकडून प्रक्षेपित झालेल्या ज्ञानशक्तीचे प्रमाण

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांंच्या श्री दत्तरूपातील सोहळ्याची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हा संपूर्ण सोहळा निर्बीज समाधी अवस्थेत राहून स्वत:कडे त्रयस्थपणे पाहून अनुभवत होते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून ईश्वराचे निर्गुण स्तरावरील चैतन्य पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाले होते. त्यामुळे हा सोहळा पहात असतांना साधकांना मन निर्विचार होणे किंवा ध्यान लागणे आणि आनंदासह शांतीची अनुभूती येणे, अशा अनुभूती आल्या. यावरून सप्तर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही आध्यात्मिक स्तरावर दिलेली उपाधी किती योग्य आहे’, याचीच प्रचीती साधकांना आली.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणी ही चारोळी समर्पित करते…

श्रीगुरूंनी श्री दत्तरूपात दर्शन दिले ।
आमच्या जीवनाचे सार्थक झाले ।
नयनांनी मनोहारी रूप पाहिले ।
‘सच्चिदानंद परब्रह्म’ हृदयात सामावले ।।

कृतज्ञता

हा दिव्य सोहळा पहात असतांना आम्हा साधकांना दिव्यत्वासह अत्यानंद आणि परमशांती यांची अनुभूती आली’, यासाठी आम्ही श्री दत्तरूपी सच्चिदानंद परब्रह्म  डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहोत.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.७.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक