१. ‘शिबिरासाठी रामनाथी आश्रमात आल्यावर मला पुष्कळ चैतन्य जाणवले. माझे नाम सतत चालू होते.
२. शिबिराच्या दुसर्या दिवशी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
२ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी
१. माझी भावजागृती झाली.
२. ‘वातावरणातील प्रकाश पुष्कळ वाढला आहे’, असे मला जाणवले, तसेच सगळीकडे चैतन्य जाणवत होते.
३. शिबिरात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलत असतांना मला त्यांच्याभोवती पांढरा प्रकाश दिसला आणि त्या पांढर्या प्रकाशातच परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले. तो प्रकाश पुष्कळ मोठा मोठा होत होता. हे सर्व बघून माझा भाव जागृत झाला.
४. ‘माझी काही पात्रता नसतांना ईश्वराने मला एवढी अनुभूती दिली’, असे मला वाटले.
५. मी मला आलेली वरील अनुभूती श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितली. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली.
३. शिबिराच्या दुसर्या दिवशी आलेल्या अनुभूती
३ अ. प्रार्थना केल्यावर गुरुकृपेने व्यासपिठावर जाऊन विषय मांडता येणे : शिबिराच्या प्रायोगिक भागात प्रत्येक युवा साधकाला व्यासपिठावर जाऊन एका विषयावर बोलायचे होते. मी ‘प्रार्थनेचे महत्त्व’ या विषयावर बोलायचे ठरवले. मला व्यासपिठावर जाऊन बोलायला पुष्कळ भीती वाटत होती. या आधी मी कधीच व्यासपिठावर जाऊन बोलले नव्हते. मी गुरुदेवांना ‘तुम्हीच माझ्याकडून बोलून घ्या’, अशी प्रार्थना केली. तेव्हा ‘ईश्वरच माझ्याकडून बोलून घेत आहे’, असे मला जाणवले. विषय संपल्यावर ‘मी हे सर्व बोलले’, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. त्या वेळी माझ्याकडून लगेचच ईश्वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
३ आ. भाववृद्धी सत्संग चालू असतांना माझे हात आणि पाय यांवर दैवी कण दिसले. तेव्हा माझा भाव जागृत झाला.
‘गुरुदेवांच्या कृपेमुळे मला या सर्व अनुभूती आल्या’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. अवंती नामदेव उरकुडे, चंद्रपूर (८.११.२०२१)
दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्या या कणांचे ‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |