अग्निपथ योजनेच्या विरोधातील हिंसाचारात रेल्वेची २६० कोटी रुपयांची हानी ! – रेल्वेमंत्री

२ सहस्र ६४२ आंदोलकांना अटक

रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव

नवी देहली – केंद्र सरकारने अग्निपथ योजना आणली, तेव्हापासून विरोधकांनी असे वातावरण निर्माण केले की, या योजनेच्या विरोधात देशभरात प्रचंड हिंसक निदर्शने करण्यात आली. या योजनेला बिहार राज्यात सर्वाधिक विरोध झाला. अनेक रेल्वेगाड्या जाळल्या. अग्निपथ योजनेच्या विरोधातील हिंसाचारात रेल्वेची एकूण २६० कोटी रुपयांची हानी झाली, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी नुकतीच संसदेत एका लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.

अग्निपपथ योजनेच्या विरोधातील आंदोलनाच्या कालावधीत देशभरात एकूण २ सहस्र १३२ रेल्वेगाड्या रहित कराव्या लागल्या होत्या. या वेळी उसळलेल्या हिंसाचारात २ जण ठार झाले, तर ३५ जण घायाळ झाले होते. या वेळी २ सहस्र ६४२ आंदोलकांना अटक करण्यात आली, अशीही माहिती अश्‍विनी वैष्णव यांनी दिली.

संपादकीय भूमिका

हिंसक आंदोलन करून सार्वजनिक मालमत्तेची हानी करणार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकून त्यांच्याकडून हानीभरपाई वसूल करावी, त्याचा भुर्दंड जनतेवर पडू देऊ नये !