परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सव सोहळ्याचा खर्‍या अर्थाने लाभ करून घेणारी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय ११ वर्षे) !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. रथोत्सव सोहळा झाल्यापासून मन शांत, आनंदी आणि निर्विचार स्थितीत असल्याचे अनुभवणे

‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) जन्मोत्सवानिमित्त रामनाथी आश्रमात रथोत्सव सोहळा झाला. त्या दिवसापासून माझे मन पूर्ण शांत, आनंदी आणि स्थिर आहे. माझे मन अखंड निर्विचार स्थितीत असून मनामध्ये अखंड ‘निर्विचार’ हा नामजप चालू असतो. कधी कुठल्या गोष्टींविषयी मनात विचार आले, तर लगेच गुरुदेवांचे रथातील सुंदर रूप डोळ्यांसमोर येते आणि माझे मन शांत होते. गुरुदेवांच्या कृपेनेच मी हे अनुभवू शकत आहे.

कु. श्रिया राजंदेकर

२. अनुभूतीविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेले कौतुकोद्गार

परात्पर गुरुदेवांना ही अनुभूती कळवल्यावर त्यांनी निरोप दिला, ‘‘पुष्कळ छान अनुभूती आहे. तुला आली, तशी अनुभूती कुणालाच येत नाही. तू एकमेव आहेस, जिने या रथोत्सवाचा खर्‍या अर्थाने लाभ करून घेतला आहे.’’

३. कृतज्ञता

गुरुदेवांनीच माझ्याकडून ही अनुभूती लिहून घेतली आणि मला त्यांना अनुभवण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच राहील.’

– कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ११ वर्षे), फोंडा, गोवा. (१.७.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक