लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील चारबाग रेल्वे स्थानकात नमाजपठण करण्यास हिंदु महाभसेकडून विरोध

रेल्वे प्रशासनाला निवेदन देताना हिंदु महासभेचे कार्यकर्ते

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील चारबाग रेल्वे स्थानकात काही मुसलमान नमाजपठण करत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. त्यानंतर याला विरोध होत आहे. हिंदु महासभेने ‘प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे असे होत आहे’, असा आरोप केला आहे. या प्रकरणी हिंदु महासभेने रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. हिंदु महासभेने म्हटले आहे की, कुणी सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करील, तर आम्ही तेथे जाऊन हनुमान चालिसाचे पठण करू.

काही दिवसांपूर्वीच शहरातील लुलू मॉल (मोठे व्यपारी संकुल) येथे काही मुसलमानांनी नमाजपठण केल्याचे समोर आल्यानंतर त्याला हिंदु संघटनांकडून विरोध करण्यात आला. त्यांनी येथे हनुमान चालिसाचे पठण करण्याचाही प्रयत्न केला.

संपादकीय भूमिका

‘सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण केल्यावर कोणतीही कारवाई होत नाही’, हे मुसलमानांना ठाऊक असल्यामुळे अशा घटना घडत आहेत आणि पुढेही घडत रहाणार आहेत. त्या रोखायच्या असतील, तर कठोर शिक्षा करण्यास प्रारंभ करण्याची आवश्यकता आहे !