प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नायर यांचा गौप्यस्फोट
नवी देहली – खलिस्तानच्या मागणीचे नेतृत्व करणार्या आतंकवादी भिंद्रनवाले याला आरंभीच्या काळामध्ये राजकीय आणि आर्थिक संरक्षण देण्याचे काम काँग्रेसने केले होते. वर्ष १९७५ मध्ये लागू केलेली आणीबाणी संपल्यावर काँग्रेसला देशभरातील निवडणुकांमध्ये पराभव पहावा लागला. त्या वेळी पंजाबमध्ये अकाली दल आणि जनता पक्षाचे सरकार निवडून आले. काँग्रेसचे तत्कालीन नेते आणि इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांनी अकाली दलाची शक्ती न्यून करण्यासाठी भिंद्रनवालेे यांना माध्यम केले. त्यांना काँग्रेसने राजकीय संरक्षण देण्यासह पैसाही पुरवला, असा गौप्यस्फोट प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नायर यांनी त्यांच्या आत्मकथेत केला.
नायर यांनी त्यांच्या आत्मकथेमध्ये त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत वरील माहिती दिली आहे. पुढे भिंद्रनवाले याच्यामुळेच इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली.
संपादकीय भूमिका
|