(म्हणे) ‘नूपुर शर्मा यांची हत्या करणार्‍याला स्वतःचे घर देणार !

अजमेर दर्ग्याचा खादिम सलमान याचे आवाहन

(खादिम म्हणजे सेवक)

अजमेर (राजस्थान) – ‘जो नूपुर शर्मा यांची मान घेऊन येईल, त्याला मी माझे घर देईन’, असे आवाहन येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याचा खादिम सलमान याने केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यावरून पोलिसांनी खादिम सलमान याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. (केवळ गुन्हा नोंदवून थांबू नये, तर अशांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक) सलमान हा सराईत गुन्हेगार असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहेत. (अनेक गुन्हे केलेले गुन्हेगार मोकाट असल्याने ते पुढे जाऊन अशा प्रकारचे आणखी गुन्हे करतात, यातून कायद्यातील त्रूटी उघड होते ! पहिल्याच गुन्ह्याच्या वेळी कठोर शिक्षा झाली, तर गुन्हेगार पुन्हा गुन्हे करण्यास धजावणार नाही, असा वचक निर्माण झाला पाहिजे ! – संपादक)

१. या व्हिडिओमध्ये खादिम सलमान पुढे म्हणतो की, मी नूपुर शर्मा यांना भर चौकात गोळ्या मारल्या असत्या. मी आजही चिरण्याचे धाडस दाखवू शकतो.

२. १७ जून या दिवशी येथे काढण्यात आलेल्या मोर्च्याच्या वेळी या दर्ग्याचा खादिम गौहर चिश्ती याने आक्षेपार्ह भाषण केले होते. या मोर्च्यात शिरच्छेद करण्याच्या घोषणा देण्यात येत होत्या.

संपादकीय भूमिका

  • अशा प्रकारचे आवाहन होत असल्यामुळेच या देशात हिंदूंच्या हत्या होत आहेत, तसेच त्यांना धमक्या मिळत आहेत. याविषयी एकही इस्लामी देश किंवा त्यांची संघटना तोंड उघडत नाहीत आणि सरकारही अशांवर कठोर कारवाई करत नाही, हे लज्जास्पद !
  • राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांधांना अशा प्रकारची विधाने करण्याचे आणि हिंदूंच्या हत्या करण्याचे बळ मिळत आहे, हे लक्षात घ्या !