गोंडा (उत्तरप्रदेश) येथे दलित तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न

जावेद, महमूद आणि इबरार यांच्यावर गुन्हा नोंद

गोंडा (उत्तरप्रदेश) – येथे एका दलित तरुणीचे अपहरण करणे, तिच्यावर सामूहिक बलात्कार करणे आणि तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव निर्माण करणे या प्रकरणी पोलिसांनी जावेद, महमूद  आणि इबरार यांच्यावर गुन्हा नोंदवला असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

या तरुणीच्या कुटुंबियांनी सांगितले की, जावेद त्यांच्याच गावातील तरुण असून तो मुंबईत नोकरी करतो. तो सतत पीडित मुलीला मुंबईत येण्यास सांगत होता. एकेदिवशी त्याने तिला बेशुद्ध करून तो मुंबईला घेऊन गेला. तेथे जावेद, महमूद आणि इबरार यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तेथे तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव निर्माण केला. अटक होण्याच्या भीतीने नंतर जावेद याने मुलीला परत गोंडा येथे आणून सोडले.

संपादकीय भूमिका

अशांना आखाती देशांत ज्या प्रमाणे शरियतनुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार करण्याची शिक्षा दिली जाते, तशी शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !