हिंदु जनजागृती समितीचे कार्य उत्तरोत्तर वाढत राहो ! – पू. सु.ग. तथा बाळासाहेब स्वामी

‘गुरुपौर्णिमा महोत्सव २०२२’च्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करतांना  राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांचे वंशज श्रीक्षेत्र सज्जनगड येथील संत पू. सु.ग. तथा बाळासाहेब स्वामी आणि इतर

सातारा, २६ जून (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दिले जाणारे धर्मशिक्षण हे वैशिष्ट्यपूर्ण तर असतेच शिवाय ते समाजासाठी दिशादर्शक आहे. अत्यल्प काळात हिंदु जनजागृती समितीचे कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचले आहे. राष्ट्र आणि धर्म यांसाठीचे हे कार्य असेच उत्तरोत्तर वाढत राहो, अशी समर्थचरणी प्रार्थना, असे आशीर्वाद देतांना राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांचे वंशज पू. सु.ग. तथा बाळासाहेब स्वामी यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा जिल्ह्यात ३ ठिकाणी गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ‘गुरुपौर्णिमा महोत्सव २०२२’च्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन श्रीक्षेत्र सज्जनगड येथील राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांचे वंशज सूर्याजी गवालक्ष तथा बाळासाहेब स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राजेंद्र सांभारे, सुरेश पंडित, सनातन संस्थेच्या सौ. राजेश्वरी सांभारे, श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड येथील सातारा कार्यालयाचे पदाधिकारी सर्वश्री साईदत्त घोडके, देशपांडे आदी उपस्थित होते.