रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

१. ‘या आश्रमाला भेट दिल्यानंतर ‘आपण साधना करणे आवश्यक आहे’, असे मला वाटले.’

– श्री. गिरीश कोट्टारी, उपाध्यक्ष, किसान संघ, कर्नाटक. (१३.६.२०२२)

२. ‘हा आश्रम सद्गुणांनी परिपूर्ण आणि पुष्कळ उत्तम आहे. हिंदु धर्मासाठी कार्य करणार्‍या तुमच्या उत्तम अशा या सेवेला आमचा पाठिंबा आहे.’

– श्री. पुरंदर पुजारी, काटेपळ्ळ, मंगळुरू. (१२.६.२०२२) ०

३. ‘आश्रम पहातांना मला पुष्कळ आनंद झाला. माझे मन शांत झाले. आश्रमात चालू असलेले संशोधन लवकरात लवकर सर्वांपर्यंत पोचवावे.’

– अधिवक्त्या (सौ.) बबिता महापात्रा, राऊरकेला, ओडिशा

४. ‘संपूर्ण आश्रम सकारात्मक ऊर्जेने (चैतन्याने) भरला आहे. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात एकदा तरी आश्रमाला भेट देण्यास आमंत्रित करायला हवे.’

– अधिवक्ता तन्मय टी. गावस, सदस्य, विश्व हिंदु परिषद, आमोणा, डिचोली, गोवा.

५. ‘आश्रमात सर्वत्र आनंद आणि शांती आहे. आश्रम पहाणे, हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव होता. आश्रम स्वयंपूर्ण आहे. भविष्यात नातेवाईक आणि मित्र-मंडळी यांना घेऊन येण्याचा माझा मानस आहे.’

– सौ. पूजा सुनील शिरसाट, म्हापसा, गोवा.

सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

१. ‘सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन अतिशय बोधप्रद आहे. प्रत्येकाने त्याच्या दैनंदिन जीवनात घडणारे प्रसंग आणि जीवनचक्र यांबद्दल जागरूक असले पाहिजे.’

– अधिवक्ता तन्मय टी. गावस, आमोणा, डिचोली, गोवा.

२. ‘आपले शरीर आणि दैनंदिन जीवन यांवर परिणाम करणार्‍या असंख्य शक्ती आहेत’, हे मला समजले. प्रदर्शन अतिशय रोचक आणि समाधानकारक आहे. ’

– श्री. पुष्पराज कामत नावेलकर, डिचोली, गोवा.

  • सूक्ष्म :व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक