पाकिस्तानात सासर्‍याने स्वतःच्या सुनेला कुर्‍हाडीने वार करून ठार केले !

कराची (पाकिस्तान) – येथील मुख्तार अहमद नामक मुसलमानाने स्वतःच्या सुनेला कुर्‍हाडीने वार करून ठार केले. अभियंता असलेल्या आणि ऑस्ट्रेलिया येथे वास्तव्य करणार्‍या साजिदा तस्मिन हिने मुलांसमवेत परत ऑस्ट्रेलिया येथे जाण्याबाबत विचारणा केल्यानंतर अहमद याच्यासमवेत तिचा वावविवाद झाला. त्या वेळी संतप्त झालेल्या मुख्तार अहमद याने प्रथम साजिदा तस्मिनला कोंडले व त्यानंतर तिच्यावर कुर्‍हाडीने वार केले तिला ठार केले. साजिदा तस्मिनचे वडील या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत.

साजिदा तस्मिनचे वडील शेर महंमद खान यांनी घटनेविषयी बोलतांना सांगितले ‘साजिदा तस्मिनचा पती अयुब अहमदने तिला बळजोरीने ३ मुलांसहित पाकिस्तानात पाठवून दिले. साजिदा तस्मिन हिला मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी पुन्हा ऑस्ट्रेलियात परतायचे होते. मुख्तार अहमदने साजिदा तस्मिनचा पासपोर्ट काढून घेतला आणि यावरून वादविवाद झाले. मी जेव्हा घरी पोचलो तेव्हा पाहिले की, मुख्तार अहमदने माझ्या मुलीला स्नानगृहात बांधून ठेवले होते. तो तिला मारहाण करत होता. ‘तुम्ही मध्ये पडल्यास तुम्हालाही मारणार’, अशी धमकी त्याने दिल्याने जिवाच्या भीतीने मी मागे उभा राहिलो. त्यानंतर मुख्तार याने माझ्या मुलीवर कुर्‍हाडीने वार करून तिला ठार मारले. त्यानंतर तो फरार झाला.