सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील विविध जत्रोत्सवांनिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना साधकांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना आलेल्या अनुभूती

वर्ष २०२२ मध्ये सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील विविध जत्रोत्सवांनिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना तेथील साधकांना ‘गुरु सुचवतात, गुरुच करवून घेतात आणि गुरुच अनुभूती देतात’, या सुवचनाचा प्रत्यय आला. तेथील साधकांनी विज्ञापने मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. श्री. शंकर निकम, सावंतवाडी  

१ अ. सोनुर्ली येथील जत्रेनिमित्तच्या दैनिकासाठी विज्ञापने मिळवण्याच्या सेवेचे नियोजन करतांना सद्गुरु सत्यवान कदम यांचे अस्तित्व जाणवणे : ‘सोनुर्ली येथील जत्रेच्या निमित्ताने प्रसिद्ध होणार्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’साठी रंगीत विज्ञापने मिळवण्याचे ठरले. त्यासाठी सर्व साधकांनी सकारात्मकता दर्शवली आणि त्या दृष्टीने संपर्कांचे नियोजनही केले. हे नियोजन करतांना साधकांना सद्गुरु सत्यवान कदम यांचे अस्तित्व जाणवले.

१ आ. कृतज्ञताभावाने सेवा केल्याने अल्प वेळ सेवा करूनही मागच्या वर्षीपेक्षा अधिक विज्ञापने मिळणे : या वेळी साधकांमध्ये ‘आम्ही काही प्रयत्न करणार’, यापेक्षा ‘गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) आमच्याकडून सर्व प्रयत्न करवून घेतील’, असा कृतज्ञताभाव जागृत झाला. त्यामुळे या सेवेत सहभागी साधकांना गुरुकृपा अनुभवता आली. केवळ ५ दिवस सायंकाळी ३ – ४ घंटे सेवा करूनही मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी अधिक विज्ञापने मिळाली.’

२. श्री. सीताराम म्हापणकर, सावंतवाडी

२ अ. माजगाव येथील श्री सातेरीदेवीच्या जत्रोत्सवाच्या निमित्त रंगीत पुरवणी काढायची ठरणे आणि गुरुकृपेने त्यासाठी विशेष प्रयत्न न करताही पुष्कळ विज्ञापने मिळणे : ‘मागील वर्षी माजगाव येथील श्री सातेरीदेवीच्या जत्रोत्सवाच्या निमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’ची कृष्ण-धवल पुरवणी काढली होती. या वर्षी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि सद्गुरु सत्यवान कदम यांचा संकल्प यांमुळे रंगीत पुरवणी काढायचे ठरवले. त्यासाठी विशेष प्रयत्न न करताही आम्हाला काही नवीन संपर्क मिळाले आणि त्यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक विज्ञापने मिळाली. हे सर्व केवळ गुरुकृपेने झाले. प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि सद्गुरु सत्यवानदादा यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

३. सर्वश्री शंकर राऊळ, जीवन केसरकर, भरत राऊळ, शरद राऊळ आणि चंद्रकांत बिले, माडखोल

३ अ. साधकांनी केसरी येथील श्री देव स्वयंभू आणि माडखोल येथील श्री पावणाईदेवी यांचा जत्रोत्सव यांसाठीच्या रंगीत पुरवणीसाठी भावाच्या स्तरावर प्रयत्न करणे : ‘केसरी येथील श्री देव स्वयंभू आणि माडखोल येथील श्री पावणाईदेवी यांचा जत्रोत्सव यांसाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ची रंगीत पुरवणी काढायचे ठरले. त्यासाठी साधकांनी अधिक विज्ञापने मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले. साधकांनी मंदिरात श्रीफळ अर्पण करून भावपूर्ण आणि तळमळीने प्रार्थना केली. साधकांनी विज्ञापने मिळवण्यासाठी भावाच्या स्तरावर प्रयत्न करायचे ठरवले.

३ आ. सर्व साधकांनी गुरुमाऊलीचे अस्तित्व अनुभवणे आणि त्यांना अल्पावधीत अधिक रकमेची विज्ञापने मिळणे : तेव्हा सर्व साधकांनी प्राणप्रिय गुरुमाऊलीचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अस्तित्व अनुभवले. मागील वर्षापेक्षा या वर्षी साधकांना अवघ्या ४ दिवसांत सहजपणे अधिक रकमेची विज्ञापने मिळाली. त्यामुळे साधकांचा आत्मविश्वास वाढला. सर्व साधकांनी गुरुमाऊली आणि सद्गुरु सत्यवानदादा यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

३ इ. कुणालाही विज्ञापन न देणार्‍या महाविद्यालयाकडून विज्ञापन मिळणे : सावंतवाडी तालुक्यात एक महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय कुणाला विज्ञापन देत नाही; मात्र त्यांना सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य सांगितल्यावर त्यांनी जत्रोत्सवासाठी कोणतीही आडकाठी न करता विज्ञापन दिले.

३ ई. साधकांनी विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना जिज्ञासूंना साधना सांगितली.’

४. श्री. संदीप नाणोसकर आणि बांदा येथील साधक

४ अ. बांदा येथील जत्रोत्सवाच्या निमित्ताने विज्ञापने मिळवण्याच्या मोहिमेत साधकांनी विज्ञापनदात्यांच्या कुटुंबियांना साधना आणि सनातनच्या अध्यात्मप्रसाराचे कार्य सांगणे : ‘मागील ३ वर्षांप्रमाणे बांदा येथील साधकांनी श्री भूमिका-बांदेश्वर जत्रोत्सवाच्या निमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक काढण्यासाठी नियोजन केले. सर्व साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु सत्यवानदादा यांना प्रार्थना केली, ‘या सेवेच्या माध्यमातून आमची साधना करवून घ्या. आमच्यामध्ये समष्टी भाव वृद्धींगत होऊ दे.’ साधकांनी श्री भूमिकादेवीच्या चरणी श्रीफळ अर्पण करून सेवेला आरंभ केला. देवाने सुचवल्यानुसार साधकांनी विज्ञापनदात्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुुंबियांना साधना आणि सनातनचे अध्यात्मप्रसाराचे कार्य यांविषयी माहिती सांगितली. यातून ‘विज्ञापनदाते साधनेच्या अनुषंगाने काय करू शकतात ?’, याविषयी त्यांच्याशी संवाद साधता आला.’

५. श्री. संदीप नाणोसकर, बांदा

५ अ. अल्प साधकसंख्येत श्री स्थापेश्वर-महालक्ष्मी जत्रोत्सवाच्या रंगीत विशेषांकाला विज्ञापने मिळणे : ‘डेगवे येथील श्री स्थापेश्वर-महालक्ष्मी जत्रोत्सवासाठी मागील २ वर्षांप्रमाणे या वर्षीही दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक काढण्याचे आणि त्यासाठी विज्ञापने घेण्याचे नियोजन करण्यात आले. अल्प साधकसंख्या असतांनाही या जन्मोत्सवाच्या रंगीत विशेषांकाला विज्ञापने मिळाली. साधकांनी या मोहिमेत संबंधितांना सनातन संस्थेचे कार्य सांगितले.

५ आ. या मोहिमेचे वैशिष्ट्य, म्हणजे एक विज्ञापनदाते विज्ञापने मिळवण्याच्या सेवेत ३ दिवस सहभागी झाले होते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १.२.२०२२)

जत्रा मोहिमेचा लेख संकलित करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण होऊन भावजागृती होणे

‘जत्रा मोहिमेचा हा लेख संकलित करण्यासाठी प्रारंभ केल्यावर मला परात्पर गुरु डॉक्टरांची पुष्कळ आठवण आली. ही सेवा करतांना माझ्या डोळ्यांतून थंड भावाश्रू येत होते.’ ॐ – श्री. संदीप नाणोसकर, बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग. (१.२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक