आरोपीला ‘पॉक्सो’समवेत तिहेरी जन्मठेप !

दोन मासांत जलदगती न्यायालयाचा निकाल !

प्रतिकात्मक छायाचित्र

यवतमाळ, १४ मे (वार्ता.) – जिल्ह्याअंतर्गत आर्णी तालुक्यातील बोरगाव येथील संजय मोहन जाधव (वय २४ वर्षे) याला जलदगती न्यायालयाने २ मासांत ‘पॉक्सो’, बलात्कार आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत तिहेरी जन्मठेपेची शिक्षा दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत या ऐतिहासिक निकालाची माहिती दिली. पीडित मुलगी, तिची आई, पडताळणी करणारे आधुनिक वैद्य यांची साक्ष यांत महत्त्वाची ठरली. न्यायाधीश हिंमत मनवर यांनी केवळ ६० दिवसांत या प्रकरणाचा निकाल दिला. (असा तत्परतेने निकाल दिल्यासच अत्याचाऱ्यांवर वचक निर्माण होईल आणि प्रलंबित खटलेही मार्गी लागतील ! – संपादक)