परात्पर गुरु डॉ. आठवलेलिखित आध्यात्मिक संशोधनावर आधारित १ शोधनिबंध एप्रिल २०२२ या मासामध्ये वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर !

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले लिखित आध्यात्मिक संशोधनावर आधारित १ शोधनिबंध एप्रिल २०२२ या मासामध्ये वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर करण्यात आला. त्याची माहिती येथे देत आहोत.

या शोधनिबंधाचे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे सहलेखक श्री. शॉन क्लार्क (संपादक ‘ssrf.org’ आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे सदस्य) असून त्यांनीच त्याचे सादरीकरणही केले आहे. विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत १७ राष्ट्रीय आणि ७५ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ९२ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी ९ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ मिळाले आहेत.