संभाजीनगर येथे अजान चालू असतांना ध्वनीक्षेपकावर गाणे लावल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकांवर गुन्हा नोंद !

संभाजीनगर – अजान चालू असतांना येथील रेल्वे सुरक्षा दल पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक किशोर मलकूनाईक यांनी मोठ्या आवाजात गाणे लावले. या प्रकरणी त्यांच्यावर सातारा पोलीस ठाण्यात २५ एप्रिल या दिवशी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी त्या भागातील नागरिकांनी याविषयी नियंत्रण कक्षात तक्रार दिली. ‘पोलीस उपनिरीक्षक मलकूनाईक यांच्या घराच्या मागे असलेल्या मशिदीच्या दिशेने नमाजपठण चालू असतांना त्यांनी मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपकावर गाणे लावले. यातून २ धर्मांत तेढ निर्माण होऊ शकते आणि वेगवेगळ्या गटात शत्रूत्व वाढू शकते. त्यामुळे ही क्रिया चिथावणीखोर आहे. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे’, अशी माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका 

  • मशिदींवरील भोंग्यावरून अजानद्वारे नागरिकांना त्रास देणाऱ्या मौलानांवर पोलीस गुन्हे नोंद का करत नाहीत ?
  • मशिदीच्या समोर ध्वनीक्षेपकावरून गाणे लावल्यानंतर पोलीस तत्परतेने लगेच इतरांवर गुन्हे नोंद करतात; मात्र सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही ध्वनीप्रदूषण करून नागरिकांना त्रास होत असतांना मशिदींवरील भोंगे तत्परतेने काढत नाहीत, यावरून ‘पोलीस हिंदुद्वेषी आहेत’, असे म्हणायचे का ?