रामराज्याप्रमाणे आदर्श हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी महाराष्ट्रात धर्मप्रेमी हिंदूंचे श्री हनुमंताच्या चरणी साकडे !

  • परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना !

  • सामूहिक नामजप, प्रवचन, फलकप्रसिद्धी, ग्रंथप्रदर्शन आदी उपक्रमांद्वारे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर आणि कर्नाटक येथे संतांच्या उपस्थितीत देवतांना साकडे !

कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मी मंदिरात साकडे घालतांना  पू. सदाशिव (भाऊ) परब आणि हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, १६ एप्रिल (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात सनातन संस्थेचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांच्या वंदनीय उपस्थितीत श्री महालक्ष्मीदेवीला साकडे घालण्यात आले. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेना उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. मधुकर नाझरे, भाविक श्री. कृष्णा बाबर, ‘मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. रणजित घरपणकर उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहर, गडहिंग्लज, इचलकरंजी, आजरा, वारणा, कागल, कर्नाटकातील निपाणी येथील ५० हून अधिक मंदिरांमध्ये हिंदूंनी हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध होण्याची शपथ घेतली.

पुणे जिल्ह्यामधील विविध उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

पूजन केलेली गदा

पुणे – प्रभु श्रीरामांच्या कृपेने रामराज्य अर्थात् हिंदु राष्ट्र स्थापनेला बळ मिळावे आणि हिंदूंमध्ये शौर्यजागरण व्हावे, यासाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने पुणे येथे १७ ठिकाणी ‘गदापूजन’ करण्यात आले. या कार्यक्रमांना विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता, तसेच जिल्ह्यात एकूण ५ मारुति मंदिरांत साकडे घालण्यात आले, तर एकूण २७ ठिकाणी सनातननिर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचे कक्ष लावण्यात आले होते. या कक्षाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, धर्मप्रेमी, वाचक, हितचिंतक आणि भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

वैशिष्ट्यपूर्ण

१. कु. अनुजा गायकवाड या बालसाधिकेने फलक लिखाणाची सेवा भावपूर्ण केली.

२. मनोहरनगर येथील एका गिरणीत सौ. ज्योत्स्ना शिंदे यांनी हनुमान जयंतीचा फलक लावला.

३. नामजप सत्संगातील, तसेच साधना सत्संगातील जिज्ञासूंनी फलक लिखाण केले.

पुणे

१. साधना सत्संगातील जिज्ञासू सौ. उषा पाटील यांनी केलेले फलक लिखाण

२. चिंचवड स्टेशन हनुमान मंदिर येथील ग्रंथप्रदर्शन कक्ष

३. वीर हनुमान मंदिर, शरदनगर, चिखली, मोरेवस्ती, पुणे येथील कक्ष

रायबाग येथे सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्या उपस्थितीत साकडे !

रायबाग (कर्नाटक) येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या देवस्थानात साकडे घालतांना  पू. रमानंद गौडा, तसेच अन्य

रायबाग (कर्नाटक) – रायबागची ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीच्या देवस्थानात विशेष पूजेसह सामूहिक प्रार्थना करण्यात आली आणि साकडे घालण्यात आले. या प्रसंगी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा, ‘देवस्थान जिर्णोद्धार समिती’चे श्री. जयदीप देसाई आणि स्थानिक पुरोहित वृंद उपस्थित होते.

सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यांत हनुमान जयंती निमित्त ठिकठिकाणी ‘गदापूजन’ उत्साहात !

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील मंदिरात भावपूर्णपणे करण्यात आलेले गदेचे पूजन

सोलापूर, १६ एप्रिल (वार्ता.) – श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांतील विविध ठिकाणी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ‘गदापूजन’ करण्यात आले. सोलापूर येथील पंचमुखी हनुमान मंदिर, दोदेनगर येथील हनुमान मंदिर, शेळगी येथील शिव मारुति मंदिर, विडी घरकूल येथील वैष्णव मारुति मंदिर, होटगी नाका येथील हनुमान मंदिर, अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिर यांसह धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये एकूण
१९ ठिकाणी ‘गदापूजन’ करण्यात आले. या कार्यक्रमाला ३०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते.

सोलापूर येथील शिव मारुति मंदिर येथे धर्मप्रेमींनी केलेले गदापूजन

शेळगी येथील श्री शिव मारुति मंदिर येथे श्री. विजय विभूते, श्री. शिवा विभूते, श्री. यशराज विभूते यांनी पुढाकार घेऊन गदेचे पूजन केले. येथील मंदिर समितीचे विश्वस्त श्री. सिद्रामप्पा नरोणे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक केले. ते या वेळी म्हणाले, ‘‘समितीचे कार्यकर्ते निष्काम भावाने कार्य करतात. समितीच्या कार्यासाठी कोणतेही साहाय्य लागल्यास अवश्य सांगा.’’

हनुमान जयंतीच्या निमित्ताने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत साकडे, तसेच ग्रंथप्रदर्शन यांस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

रामतीर्थ, आजरा येथील हनुमान मंदिरात साकडे घालण्याच्या प्रसंगी उपस्थित भाविक आणि धर्मप्रेमी

कोल्हापूर, १६ एप्रिल (वार्ता.) – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत विविध हनुमान मंदिरांमध्ये साकडे घालण्यात आले. दोन्ही जिल्ह्यांत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर येथील प.पू. तोडकर महाराज यांच्या द्रोणागिरी आश्रमात साकडे घालतांना भाविक

१. कोल्हापूर येथील प.पू. तोडकर महाराज यांच्या द्रोणागिरी मठात साकडे घालण्यात आले. या संदर्भात मठातील व्यवस्थापकांनी तत्परतेने सहकार्य केले. येथे ‘सनातन प्रभात’च्या वाचक सौ. मनीषा लळित सहभागी झाल्या होत्या.

 

शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती (जिल्हा कोल्हापूर) येथील शिराळकर ट्रस्टच्या दक्षिणमुखी हनुमानमंदिरात साकडे घालतांना भाविक

२. शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथील शिराळकर ट्रस्टच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात मंदिराचे मालक श्री. शिराळकर, श्री हनुमान जयंतीप्रमुख श्री. चंद्रकांत कुंभार यांसह अन्य भाविक सहभागी झाले आहेत. श्री. शिराळकर यांनी साकड्याचा नारळ अर्पण केला.

३. शाहूवाडी (मलकापूर) येथील हनुमान मंदिरात भाविक श्री. चंद्रकात म्हापसेकर, डॉ. जे.बी. पाटील (शिगांवकर), डॉ. अशोक जंगटे, श्री. किशोर बेर्डे, श्री. प्रकाश मोरे, सौ. पूनम मिरजे, सरपंच सौ. वैशाली लाळे उपस्थित होते.

इचलकरंजी येथील सोनपावली मारुति मंदिरात साकडे घालतांना भाविक

४. इचलकरंजी येथील सोनपावली मारुति मंदिरात साकडे घालण्याच्या प्रसंगी धर्मप्रेमी सर्वश्री रघुवीरजी ओझा, सन्नतकुमार दायमा, श्रीनिवास शर्मा, पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक सौ. सुनीता जासू, सौ. नलिनी ओझा यांसह १५० धर्मप्रेमी उपस्थित होते. इचलकरंजी शहरात ११ ठिकाणी साकडे घालण्यात आले.

विशेष – या वेळी महाआरती, सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यात आले.

५. खेडे – आजरा येथे श्री हनुमान मंदिर, आवंडी येथे विठ्ठल मंदिर, तर रामतीर्थ आजरा येथील हनुमान मंदिरात धर्मप्रेमी भाविक उपस्थित होते.

बत्तीस शिराळा (जिल्हा सांगली) येथील भुईकोट किल्ला येथे एकत्र येऊन हनुमान चालीसा, श्रीरामरक्षा, मारुतिस्तोत्र यांचे पठण करतांना भाविक

बत्तीस शिराळा (जिल्हा सांगली) येथील भुईकोट किल्ला येथे एकत्र येऊन हनुमान चालिसा, श्रीरामरक्षा, मारुतिस्तोत्र यांचे पठण केले. यात सर्वश्री दर्शन जोशी, गुरुप्रसाद कुलकर्णी, शुभम देशमुख, केदार यादव, प्रीतम हसबनीस, संग्राम हसबनीस, स्वानंद जोशी यांसह ७० भाविक सहभागी झाले होते.

गांधी पुतळा येथील मारुति मंदिरात घालण्यात आलेल्या साकड्याच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या धर्मप्रेमी महिला

तुंग (जिल्हा सांगली) येथील ग्रंथप्रदर्शनास भेट देतांना हरिपूरचे सरपंच श्री. विकास हणबर
ग्रंथप्रदर्शनास भेट देतांना  भाजपचे खासदार संजय पाटील

सांगली – तुंग येथील ग्रंथप्रदर्शनास सांगली जिल्ह्याचे भाजपचे खासदार श्री. संजय पाटील यांनी भेट दिली, तसेच ग्रंथही विकत घेतले. येथे हरिपूरचे सरपंच श्री. विकास हणबर यांनीही सदिच्छा भेट दिली.

काँग्रेसचे आमदार  श्री. गणेश हुक्केरी यांनी कक्षावर भेट देतांना

निपाणी – काँग्रेसचे आमदार श्री. गणेश हुक्केरी यांनी निपाणी येथील कक्षावर भेट दिली. ‘ग्रंथालयासाठी ग्रंथ भेट देऊया. मला संपर्क करावा’, असे सांगितले.

हनुमान जयंतीनिमित्त मुंबईत सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे २४ ठिकाणी प्रदर्शन !

सहस्रो जिज्ञासूंनी घेतला लाभ

शीव येथील हनुमान मंदिराच्या ठिकाणी लावलेले ग्रंथप्रदर्शन

मुंबई, १६ एप्रिल (वार्ता.) – हनुमान जयंतीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबईतील विविध मंदिरांत सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. मुंबई, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत २४ ठिकाणी हे प्रदर्शन लावण्यात आले. यामध्ये मुंबईतील दहिसर (अशोकवन), कांदिवली, गोरेगाव (मसुराश्रम मंदिर), अंधेरी (चार बंगला संकटमोचन हनुमान मंदिर), जोगेश्वरी (मेघवाडी हनुमान मंदिर), वांद्रे, दादर, शीव, वडाळा, पवई (आय.आय.टी.), कुर्ला (भुलिंगेश्वर मंदिर), मुलुंड (हनुमान मंदिर, बाबाजी की झोपडी), नवी मुंबईतील ऐरोली (दिवागाव), नेरूळ (इच्छापूर्ती हनुमान मंदिर, सेक्टर -८), विरार (आगामी हनुमान मंदिर), बोईसर (उद्धारी माता मंदिर, श्रीराम मंदिर नवापूर मार्ग) या मंदिरांचा समावेश आहे. हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या सहस्रो भाविकांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.

नाशिक जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन !

इंदिरानगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात साकडे घालतांना धर्माभिमानी

नाशिक – शहरातील इंदिरानगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात साकडे घालण्यात आले. भगूर येथील श्री रेणुकामाता मंदिरात सामूहिक प्रार्थना करण्यात आली. तसेच येवला येथे जुनी माळी गल्लीतील मारुति मंदिरात साकडे घालण्यात आले.