|
केवळ आकडेवारी गोळा करून उपयोग नाही, तर येथील अनधिकृत मशिदी आणि मदरसे यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे ! ‘अशा प्रकारची अवैध निर्मिती होईपर्यंत प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या ?’, याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे ! – संपादक
नवी देहली – उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि बिहार या राज्यांच्या नेपाळ सीमेजवळच्या भागांत मदरसे आणि मशिदी यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच येथील मुसलमानांची लोकसंख्या वाढल्यामुळे गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली आहे. शेजारील नेपाळशी भारताचे संबंध मैत्रीपूर्ण राहिले आहेत; परंतु चिंतेचा विषय म्हणजे नेपाळच्या सीमेजवळील भारतीय जिल्ह्यांमध्ये मदरशांची संख्या पुष्कळ वाढली आहे. भारताच्या ७ जिल्ह्यांना लागून असलेली नेपाळची ५५० किलोमीटरची सीमा लोकसंख्येच्या समतोलाच्या दृष्टीने संवेदनशील होत आहे. गोरखपूर आणि त्याच्या जवळच्या जिल्ह्यांना लागून असलेली नेपाळची सीमा अधिक संवेदनशील झाली आहे. मदरशांची संख्या आणि त्यांचे कामकाज यांविषयी दोन्ही देशांच्या अधिकार्यांमध्ये चर्चा झाली आहे; परंतु अद्याप कारवाई झालेली नाही.
१. उत्तरप्रदेशच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यात वर्ष २००० मध्ये १४७ मदरसे होते. सध्या तेथे ५९७ मदरसे असून त्यांपैकी १४५ नोंदणीकृत नाहीत.
२. महाराजगंज जिल्ह्यात २५२ मान्यताप्राप्त मदरसे कार्यरत आहेत; परंतु या जिल्ह्याच्या ८४ किलोमीटरच्या नेपाळ सीमेवर मदरशांची संख्या यापेक्षा दीडपट अधिक आहे.
३. भारताच्या सीमेला लागून असलेल्या नेपाळच्या रूपंदेही आणि नवलपरासी जिल्ह्यांत अनेक मदरसे आहेत.
सीमा पर मदरसों की संख्या और बिगड़ते जनसंख्या संतुलन से बढ़ी चिंता, मदरसों की बढ़ती संख्या से खुफियां एजेंसियां चौकन्नाhttps://t.co/QWkgbbddZW
— Hindu Samvaad (@HinduSamvaad) April 11, 2022
४. नेपाळमधील बैरहवा येथील मदरशांमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’च्या (‘आय.एस्.आय.’च्या) हस्तकांच्या वास्तव्याविषयी माहिती मिळाली होती.
५. भारतीय सीमेला लागून असलेल्या ७८४ गावांमध्ये २०५ मदरसे आहेत, तर नेपाळच्या १५७ गावांमध्ये ५३ मदरसे आहेत.
६. वर्ष १९९८ मध्ये सीमेला लागून असलेल्या नेपाळच्या कृष्णानगरमधील मदरशामध्ये २ काश्मिरी तरुण पकडले गेले होते. त्यांचा संबंध आय.एस्.आय.च्या हस्तकांशी असल्याचे सिद्ध झाले होते.
७. बिहारच्या नेपाळ सीमेवरील मधुबनी, पूर्वी चंपारण, पश्चिम चंपारण आणि सीतामढी जिल्ह्यांत गेल्या १० वर्षांत मदरशांच्या संख्येत वाढ झाली आहे. या सीमेवरील रक्सौल, रामगढवा, आदापूर, छौडादानो या प्रांतातील लहान गावांमध्ये लहान आणि मोठे असे १४९ मरदसे आहेत. यांतील केवळ ९ मदरसे नोंदणीकृत आहेत. येथील मुसलमानांची लोकसंख्या हिंदूंच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे.
८. नेपाळमधील सीमेवरील परसा, बारा आणि रौतहट जिल्ह्यांमध्येही ३०० हून अधिक मदरसे बनवण्यात आले आहेत. यांतील ४५ मदरसे गेल्या ५ वर्षांत बनवले आहेत. येथील मुसलमानांची लोकसंख्याही वाढली आहे.
९. भारतीय गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार उत्तरप्रदेश, बिहार, हरियाणा आणि पंजाब या राज्यांतून पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या देशांत जाण्यासाठी मुसलमानांसाठी एक विशेष मार्ग सिद्ध केला जात आहे. गेल्या १० वर्षांत याच मार्गाद्वारे घुसखोर मुसलमान वेगवेगळ्या ठिकाणी पोचले आणि तेथे त्यांनी बस्तान बसवले.
१०. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरील केवळ ५० किलोमिटरच्या क्षेत्रात ३ मशिदींच्या निर्मितीसाठी काश्मीरच्या मार्गे आर्थिक साहाय्य करण्यात आले.
११. केरळच्या ‘रिलीफ अँड चॅरिटेबल फाऊंडेशन ऑफ इंडिया’ने वर्ष २०१९ मध्ये पंजाबमध्ये ३ मशिदी बांधल्या. या संस्थेने काश्मीरच्या बारामुल्ला येथून २ लोकांद्वारे यासाठी पैसे पाठवले होते. या संस्थेने मशिदी बांधण्यासाठी विदेशातून ७० कोटी रुपये गोळा केले होते.