५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कनेरसर (राजगुरुनगर), पुणे येथील कु. चैतन्य गणेश दौंडकर (वय ६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. चैतन्य दौंडकर हा या पिढीतील एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तऱ्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आज चैत्र शुक्ल द्वादशीला, म्हणजे १३.४.२०२२ या दिवशी चि. चैतन्य गणेश दौंडकर याचा सहावा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. चैतन्य दौंडकर

कु. चैतन्य गणेश दौंडकर याला सहाव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. गर्भारपण

अ. ‘मी गरोदर असतांना ‘हे बाळ म्हणजे देवाने मला दिलेला प्रसाद आहे’, असा विचार येऊन माझे मन निर्विचार होत असे. त्यामुळे मला कोणतीही काळजी वाटत नव्हती. मी सतत सकारात्मक विचारांत रहात होते.

आ. मला सातवा मास चालू असतांना एकदा ग्रहण होते. त्या रात्री मी सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे वाचन केले. त्या कालावधीत माझ्या मनात वाईट विचार आले नाहीत, तसेच ‘परात्पर गुरु डॉक्टर बाळाची काळजी घेणारच आहेत’, असे मला वाटत होते.

सौ. मंगल दौंडकर

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते ३ वर्षे

२ अ १. चैतन्य आश्रमातील वातावरणात रमणे : चैतन्य दीड वर्षाचा असतांना आम्ही २ दिवस सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात गेलो होतो. आश्रम त्याच्यासाठी नवीन असूनही त्याने कोणताच त्रास दिला नाही. तो तेथे एकटाच खेळत होता.

२ अ २. सहनशीलता : चैतन्य ३ वर्षांचा असतांना अंगावर गरम पाणी पडून त्याच्या पोटाला भाजले होते. त्याला पुष्कळ त्रास होत होता; पण तो न रडता नेहमीप्रमाणे वागत होता. चैतन्यला पाहून ‘त्याला इतका त्रास होत असेल’, असे लक्षातही येत नव्हते.

२ आ. वय – ३ ते ६ वर्षे

२ आ १. सनातन-निर्मित देवतांच्या चित्रांप्रती चैतन्यचा भाव : मी चैतन्यला ‘आपण देवाचा नामजप केला की, देव आपल्याला चांगली बुद्धी देतो’, असे सांगितले होते. तेव्हा त्याने घरातील सनातन-निर्मित देवतांची चित्रे प्रत्येक खोलीत नेऊन ठेवली. तो मला म्हणाला, ‘‘आपल्या घरात बाहेरून कुणी व्यक्ती आली, तर देव तिलाही चांगली बुद्धी देईल; म्हणून मी ही चित्रे प्रत्येक खोलीत नेऊन ठेवली आहेत.’’

२ आ २. रामनाथी आश्रमात जाण्याची ओढ : माझी बहीण (सोनाली बधाले) काही दिवस आमच्याकडे आली होती. ती रामनाथी आश्रमात जायला निघाली. त्या वेळी चैतन्यला पुष्कळ वाईट वाटत होते. तो मला म्हणाला, ‘‘आपण मावशी समवेत गोव्याला जाऊया. मावशी घरी आली आणि तिने आपल्या घरात पालटच करून टाकला.’’

३. चि. चैतन्यमधील स्वभावदोष

आळशीपणा आणि राग येणे.’

– सौ. मंगल गणेश दौंडकर (चि. चैतन्यची आई), कनेरसर, राजगुरुनगर, पुणे. (१९.१.२०२२)


इतरांना साहाय्य करणारा आणि सर्वांशी प्रेमभावाने वागणारा चि. चैतन्य दौंडकर !

१. चैतन्यचे डोळे बोलके वाटतात, तसेच ‘त्याचा आवाज ऐकत रहावा’, असे वाटते.

२. प्रेमभाव : त्याच्या बाबांनी त्याला एखादे नवीन खेळणे आणले की, तो त्याच्याशी खेळायला येणाऱ्या मुलांना ते लगेच देतो.

३. जिज्ञासू वृत्ती : ‘चैतन्यला त्याच्या वयाच्या मानाने अधिक समजते’, असे माझ्या लक्षात आले. ‘मी त्याला श्री गणेशाचा नामजप करण्याविषयी सांगितले. त्या वेळी त्याने ‘हा नामजप का करायचा ? नामजप केल्याने काय होते ?’, असे विचारले. त्याला नामजप करण्याचे महत्त्व सांगितल्यावर त्याने प्रत्येक अक्षर मोठ्याने म्हणत वहीत नामजप लिहिला.

४. शेतातील कामे करायला आवडणे : त्याला शेतातील सर्व कामे करायला आवडतात. त्याने घरासमोरील एका वाफ्यात (छोट्याश्या जागेत) स्वतः करडईची भाजी लावली आहे. त्याला शेतीसंदर्भात सर्व माहिती आहे.

५. प्रांजळपणा : त्याला ‘तुझे स्वभावदोष कोणते आहेत ?’, असे विचारल्यावर कोणताही संकोच न बाळगता तो त्याविषयी सहजतेने सांगतो, उदा. मी सकाळी लवकर उठत नाही. आईने सांगितलेले ऐकत नाही.’

– सोनाली बधाले (चि. चैतन्यची मावशी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१.२०२२)


यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.