हिंदूंच्या मंदिरात घुसून देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्याइतपत धर्मांधांची मजल गेली आहे. अशा ‘आधुनिक गझनीं’वर तात्काळ कारवाई करणे आवश्यक ! – संपादक
मुझफ्फरनगर – उत्तरप्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात याकूब नावाच्या धर्मांधाने दुर्गा मंदिरात घुसून मूर्तीची तोडफोड केली. याकूब हा नुकताच पाकिस्तानाहून परतला होता. आरोपी याकूबला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. या वेळी तो जोरात ओरडून ‘मी जिहादी आहे’ असे सांगत होता. याकूबकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे फारुक नावाच्या आणखी एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.
Uttar Pradesh: Yakub caught vandalizing the idol in Shiv temple in Muzaffarnagar, handed over to police by devotees https://t.co/GddexUQQc7
— OpIndia.com (@OpIndia_com) April 11, 2022
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)
१. ११ एप्रिल २०२२ या दिवशी सकाळी ८.३० च्या सुमारास याकूब मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बाघरास्थित श्री दुर्गामातेच्या मंदिरात घुसला. त्याने दुर्गामातेच्या मूर्तीची तोडफोड केली.
२. मंदिरात उपस्थित असलेल्या पुजार्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने पुजार्यासोबत गैरवर्तन केले. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी याकूबला बेदम मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या कह्यात दिले.
३. बजरंग दलाचे स्थानिक नेते अंकुर राणा यांनी ‘ऑपइंडिया’ला सांगितले, ‘मी प्रशासनाला निवेदन दिले असून आरोपीच्या विरोधात ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’खाली कारवाई करण्याची मागणी केली आहे.’