सातारा, ४ एप्रिल (वार्ता.) – राज्यातील अल्पसंख्यांकबहुल नागरी क्षेत्रांत क्षेत्रविकास कार्यक्रमाच्या अंतर्गत वर्ष २०२१-२२ साठी मुसलमान समाजाच्या विकासासाठी ४० लाख रुपयांचे अनुदान संमत करण्यात आले आहे. या अनुदानातून सातारा येथे शादीखाना आणि गेंडामाळ येथील कब्रस्तानसाठी संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली. याव्यतिरिक्त सदरबझार येथे उर्दू शाळा चालू करण्याविषयी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच उर्दू शाळा चालू होऊन त्याचा लाभ मुसलमान विद्यार्थ्यांना मिळेल.