दैनिक ‘सनातन प्रभात’ची वैशिष्ट्ये !

१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ राष्ट्र-धर्म आणि अध्यात्म यांविषयी योग्य विचारप्रक्रिया करायला लावतात.

२. दैनिकातील ‘समर्थ’ इतके प्रभावशाली असते की, मी ते न चुकता भ्रमणभाषवरील सामाजिक माध्यमांच्या ‘स्टेट्स’वर ठेवते. ते वाचून संपर्कातील अनेकजण त्यांचे मत दर्शवतात.

३. संपादकीय अतिशय सोप्या भाषेत आणि प्रभावशाली असते. ते वाचून मी हिंदु असल्याची आणि राष्ट्र-धर्म यांप्रती स्वत:च्या कर्तव्याची जाणीव प्रखरतेने होते.

४. संतांचे मार्गदर्शन आणि दैवी बालकांविषयीचे लिखाण यांतून चैतन्य मिळते. त्यातून भावजागृती होते. माझ्या लहान मुली दैवी बालकांविषयी जिज्ञासू वृत्तीने ऐकतात आणि त्यातून त्या शिकतातही.

५. सण साजरे करण्यामागील आध्यात्मिक दृष्टीकोन आणि महत्त्व लक्षात आले. त्याप्रमाणे कृती केल्याने आध्यात्मिक लाभ होतो.

६. मंदिरे-गड यांची दुरावस्था, त्यांवरील अतिक्रमण, लव्ह जिहाद, काश्मीर समस्या, आपत्कालीन समस्या आदींविषयी सत्य माहिती मिळाली.’

– सौ. शर्वरी चव्हाण, वरळी, मुंबई

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक