‘sanatan.org’ या संकेतस्थळाविषयी वाचकांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने वर्ष २०१२ मध्ये महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या शुभ हस्ते नव्या स्वरूपातील ‘Sanatan.org’ या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. १.३.२०२२ या दिवशी, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी सनातन संस्थेच्या संकेतस्थळाचा १० वा वर्धापनदिन झाला. त्या निमित्ताने संकेतस्थळाविषयी वाचकांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय येथे देत आहोत.

१. Sanatan.org निर्मित Android आणि iOS app ला मिळालेले अभिप्राय

१ अ. सर्व्हायव्हल गाईड ॲप (Survival Guide app)

श्री. दीपक गर्ग : ‘ही अत्यंत चांगली माहिती आहे. ही माहिती संक्षिप्त रूपात ‘व्हॉट्सॲप’वरही लहान लहान लेखांद्वारे ‘शेअर’ करण्यासाठी पुष्कळ चांगले ‘ॲप्लीकेशन’ बनवणार्‍यांना धन्यवाद !’

१ आ. श्राद्धविधी ॲप (Shraddha Rituals App)

१ आ १. गणेश इस्टेट्स : ‘हिंदु धर्माला बळकटी द्यायची असेल, तर प्रत्येक हिंदूकडे हे ‘ॲप’ असणे आवश्यक आहे.’

१ आ २. प्रणिता प्रसाद : ‘हे ‘ॲप’ पुष्कळ छान आहे. श्राद्धविधी करण्यामागचे शास्त्र ‘सर्वांना समजेल’, अशा सोप्या भाषेत मांडले आहे.’

१ आ ३. दीप्ती सी. : ‘या कोरोना महामारीच्या काळात ‘श्राद्ध कसे करावे ?’ याविषयी शास्त्रोक्त माहिती मिळाली’, त्याबद्दल मनःपूर्वक आभार ! पितृदोषाची लक्षणे, कारणे आणि त्यांवरील उपायांची माहितीसुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. या माहितीतून समाजात श्राद्धाविषयी जो अपप्रचार होत आहे, त्यावरही वैज्ञानिक भाषेत उत्तर मिळाले. हे अत्यंत महत्त्वपूर्ण ‘ॲप’ आहे. सर्व लोकांनी हे ‘डाऊनलोड’ करून यामध्ये सांगितलेल्या कृती केल्या, तर त्यांनाही नक्कीच लाभ होईल.’

१ इ. सनातन चैतन्यवाणी ॲप

१ इ १. चंदना गांधी : ‘या ॲप’वरील नामजप ऐकल्यानंतर मला पुष्कळ शांत वाटते. नामजप ऐकतांना तर मला चांगले वाटतेच; पण नामजप ऐकून झाल्यानंतरही माझे मन शांत रहाते.’

१ इ २. श्री. मनोहर गजरे : ‘हे ॲप पुष्कळच उपयुक्त आहे. यातील स्तोत्रे आणि नामजप यांचे उच्चार स्पष्ट आहेत. स्तोत्र ऐकल्यावर माझे मन पुष्कळ शांत होते. रात्री झोपण्यापूर्वी नामजप ऐकल्यावर छान झोप लागते. तुमचे पुष्कळ आभार !’

१ ई. सनातन संस्था ॲप

१ ई १. श्री. अनंत सायन : ‘स्वतःमध्ये भक्ती वाढवण्यासाठी, तसेच आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी सनातन संस्थेचे हे ‘ॲप’ अतिशय उपयुक्त आहे.’

१ ई २. श्री. गुरु चकर : ‘सनातन संस्थेचे हे ‘ॲप’ अत्यंत चांगले आहे. जे यामध्ये सांगितलेला विषय वाचून कृतीत आणतील, त्यांची निश्चितच आध्यात्मिक उन्नती होईल.’

२. संकेतस्थळावर आलेले अभिप्राय

२ अ. इंग्रजी भाषेतील संकेतस्थळ (Sanatan.org/en)

२ अ १. प्रिया प्रसाद : ‘सर्व भारतियांना अभिमान वाटेल’, असे तुमचे हे संकेतस्थळ आहे. तुम्ही देत असलेल्या माहितीमुळे गाढ निद्रेत असलेले लोक जागे होतील.’

२ अ २. धनंजय चव्हाण : ‘सनातन संस्था देत असलेल्या आध्यात्मिक ज्ञानामुळे माझे जीवन पूर्णतः पालटले आहे. पुष्कळ आभार !’

२ आ. मराठी भाषेतील संकेतस्थळ (Sanatan.org/mr)

२ आ १. मृदुला दामले : ‘या संकेतस्थळावर अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. कुठलाही विधी करतांना ‘तो करण्यामागील नक्की कारण काय ?’, हे ठाऊक असणे फार आवश्यक आहे. आज याविषयी फारच छान माहिती मिळाली. धन्यवाद !’

२ आ २. प्रदीप नारायण सावंत

‘सनातनची ‘घरोघरी लागवड मोहीम’ हा लेख वाचून दिलेला अभिप्राय : ‘नमस्कार, ‘मातीविरहित लागवड कशी करावी ? आगाशीवर लागवड कशी करावी ? खत कसे वापरावे ?’, याविषयी तुम्ही या लेखात पुष्कळ चांगल्या प्रकारे सांगितले आहे. कृतज्ञता ! मला झाडांची लागवड करणे आणि त्यांची देखभाल करणे पुष्कळ आवडते. आता मी औषधी वनस्पती गोळा करण्यास आरंभ केला आहे.’

२ इ. हिंदी भाषेतील संकेतस्थळ (Sanatan.org/hindi)

२ इ १. श्री. दिलीप कुमार सिंह

‘नेहमी निरोगी रहाण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा !’, हा लेख वाचून दिलेला अभिप्राय – ‘आपण खोबरेल तेल आणि गूळ यांविषयी जी माहिती सांगितली आहे, ती आम्हाला पुष्कळच आवडली. भविष्यात लोकांनी ते आपल्या आचरणात आणले पाहिजे. असे केल्यामुळे शरीर स्वस्थ, सुंदर आणि निरोगी रहाते. त्यामुळे मी सुचवू इच्छितो की, सर्व लोकांनी या लेखामध्ये सांगितल्यानुसार आचरण करावे. धन्यवाद !’

२ इ २. राम

‘आपत्काळात जिवाच्या रक्षणासाठी आवश्यक पूर्वसिद्धता : भाग १’ हा लेख वाचून दिलेला अभिप्राय – ‘या लेखात अत्यंत सुंदर आणि दूरदृष्टीने परिपूर्ण अशा योजना दिल्या आहेत. तुमचे कार्य अतिशय सुंदर आणि उपयोगी आहे. पुष्कळ धन्यवाद आणि आभार !’

२ ई. कन्नड भाषेतील संकेतस्थळ (Sanatan.org/kannada)

२ ई १. तारा के : ‘कोरोना विषाणूंमुळे निर्माण झालेल्या आपत्काळात आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठीचा तुम्ही जो नामजप दिला आहे, तो जवळजवळ सर्वांनाच लाभदायक ठरला आहे.’

२ ई २. प्रकाश अ. : ‘परधर्मियांच्या आमीषाला बळी पडून हिंदू धर्मांतर करतात’, हे खेदजनक आहे. परिवर्तनाच्या या काळात सनातन हिंदु धर्म जतन आणि विकसित करण्याचे तुमचे कार्य अत्यंत स्वागतार्ह आहे. तुम्ही सनातन हिंदु धर्माविषयी दिलेली माहिती कौतुकास्पद आहे.’


येणार्‍या भीषण आपत्काळाला तोंड देण्यासाठी उपयुक्त असे बहुमूल्य लिखाण ‘Sanatan.org’वर उपलब्ध !

नाडीभविष्य सांगणार्‍या अनेकांनी, तसेच द्रष्ट्या साधू-संतांनी ‘हळूहळू तिसर्‍या महायुद्धाला आरंभ होणार आहे’, असे सांगितले आहे. ‘सुक्याबरोबर ओलेही जळते’, या सिद्धांतानुसार समाजातील सर्वांनाच या आपत्काळाची झळ बसणार आहे. आपत्काळात वादळ, भूकंप आदींमुळे वीजपुरवठा बंद पडतो. पेट्रोल, डिझेल आदींचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहतूक व्यवस्थाही कोलमडून पडते. त्यामुळे स्वयंपाकाचा गॅस, खाण्या-पिण्याच्या वस्तू आदी अनेक मास (महिने) मिळत नाहीत. आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये आदी उपलब्ध होणेही जवळजवळ अशक्यच असते. हे सर्व लक्षात घेऊन आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी सर्वच स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे लेख सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. वाचक पुढे दिलेल्या लिंकवर हे लेख वाचू शकतात.

https://www.sanatan.org/mr/natural-disasters-and-survival-guide

‘ॲप’ डाऊनलोड करण्यासाठी लिंकhttps://www.sanatan.org/survival-guide-app