
गोंदिया – आमगाव तालुक्याच्या बनगाव येथील आयटीआयमध्ये शिकणार्या कु. चेतन खोब्रागडे (वय १७ वर्षे) याची १० लाख रुपयांच्या खंडणीसाठी गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना २३ फेब्रुवारीला उघडकीस आली.
२२ फेब्रुवारी या दिवशी चेतन सकाळी मोठ्या आईच्या घरी रिसामा येथे जाण्यासाठी निघाला होता; मात्र रात्र झाली, तरी तो घरी न परतल्याने घरच्यांनी शोध चालू ठेवला, तसेच रात्री पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार केली. रात्री विलंबाने एका दूरभाषद्वारे ‘चेतन याचे अपहरण केले असून १० लाख रुपयांची खंडणी द्या’, अशी मागणी केली होती. हा दूरभाष क्रमांक नवेगाव खैरलांजी (मध्यप्रदेश) येथील दुर्गाप्रसाद हरिणखेडे (वय २४ वर्षे) यांचा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला कह्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने चेतन याची हत्या केल्याचे घटनास्थळ दाखवून मान्य केले. पोलिसांनी आरोपी दुर्गाप्रसाद याला अटक केली आहे.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)