हिंदुत्वनिष्ठ, नगरसेवक, सामाजिक संघटना आणि नागरिक यांची मागणी

कराड, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – स्वराज्य रक्षणासाठी प्राणांची आहुती देणार्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी शहरातील भेदा चौकातील जागा देण्यात यावी, अशी मागणी शहरातील हिंदुत्वनिष्ठ, नगरसेवक, सामाजिक संघटना आणि नागरिक यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
याविषयीचे निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना देण्यात आले. कराड येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. कृष्णा नाका येथे महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी गत २ वर्षांपासून नागरिक लढा देत आहेत. याविषयी दैत्यनिवारणी मंदिरात बैठक पार पडली. या वेळी कृष्णा नाक्यावर होणार्या वाहतूककोंडीवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी भेदा चौकातील जागा निश्चित करण्यात आली. यासाठी एक स्मारक समिती गठीत करण्याचे ठरवण्यात आले, तसेच केवळ कराड येथीलच नाही, तर ग्रामीण भागातीलही नागरिकांचा समितीमध्ये समावेश करण्याचे निश्चित करण्यात आले.
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद