
देहली – देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस गतीने वाढत आहे. मागील २४ घंट्यांत देशात २ लाख ६४ सहस्रांहून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. देशातील कोरोना संक्रमणाचा दर आता १४.७८ टक्क्यांहून अधिक झाला आहे. देहली येथे अलीकडच्या काळात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या ७५ टक्के रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसल्याचेही समोर आले आहे.
देशात १५ ते १८ वर्षे या वयोगटातील मुलांसाठी राबवण्यात येत असलेल्या लसीकरण अभियानाला यश मिळत आहे. ३ जानेवारीला हे लसीकरण चालू झाले असून ११ दिवसांत ४२ टक्के म्हणजे ३ कोटी १४ लाख मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. जानेवारी मासात ८० ते ८५ टक्के मुलांना लसीचा पहिला डोस देण्याचे केंद्रशासनाचे ध्येय आहे.
अमेरिकेत कोरोनाचा हाहा:कार : सैन्याला साहाय्यासाठी पाचारण !कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये पायाभूत वैद्यकीय सुविधा पूर्णतः कोलमडल्या आहेत. १३ जानेवारीला तेथे १ लाख ४२ सहस्रांहून अधिक रुग्ण सापडले. कोरोनाची अनियंत्रित स्थिती लक्षात घेऊन तेथील राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मिशिगन, न्यू जर्सी, न्यू मेक्सिको, न्यूयॉर्क, ओहायो आणि रॉड आयलंड येथील रुग्णालयांत सहाय्यासाठी सैन्य पाठवले आहे. |
B.K. Hariprasad :(म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी नवीन विशेष अन्वेषण पथकाची स्थापना