शाळेच्या स्वच्छतागृहात छुपे छायाचित्रक (कॅमेरा) लावणार्‍या धर्मांध शिक्षकाला अटक

असे वासनांध, ‘शिक्षक’ म्हणवण्याच्या पात्रतेचे आहेत का ? सरकारने अशांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक

धर्मांध शिक्षक नौशाद

कन्नूर (केरळ) – येथे शाळेच्या स्वच्छतागृहात छुपे छायाचित्रक (कॅमेरा) लावून त्याद्वारे मुलांचे चित्रण केल्याच्या प्रकरणी नौशाद या शिक्षकाला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

३६ वर्षीय नौशाद येथील ‘आर्.सी. अमला बेसिक अप्पर प्रायमरी’ शाळेत अरबी शिकवतो. त्याच्या भ्रमणभाष संचात अनेक आक्षेपार्ह दृश्ये संग्रहित असल्याचे आढळून आले. एका विद्यार्थिनीला शाळेच्या स्वच्छतागृहात एक भ्रमणभाष संच आढळून आला. याविषयी तिने तिच्या आई-वडिलांना माहिती दिली. तिच्या आई-वडिलांनी शाळेच्या  व्यवस्थापनाला सूचित केले. त्यानंतर मुख्याध्यापिकेने या घटनेची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी नौशाद याला अटक करून न्यायालयासमोर उपस्थित केले. त्यानंतर त्याला कारागृहात पाठवण्यात आले आहे.