दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी मान्यवर काय म्हणतात ?

‘सनातन प्रभात’ हे भगवद्गीतेप्रमाणे दिशादर्शक ! – विद्याधरपंत नारगोलकर, महामंत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे

श्री. विद्याधरपंत नारगोलकर

जरी काढले डोळे, तरी हिंदु राष्ट्राची वाट दिसेल ।
जरी कापली ही जिव्हा, हिंदुत्व मंत्र बोलेल ।।

येतो तुझ्या मागे जरी पाय तोडलेला ।
एकनिष्ठ सेवक बनलो यात मोक्ष सारा, यात मोक्ष सारा ।।

या उक्तींप्रमाणे ‘सनातन प्रभात’ आहे. हिंदु राष्ट्राच्या संदर्भातील सर्व वार्ता ‘सनातन प्रभात’मधूनच मिळतात. जसे भग्वद्गीतेतून ‘काय करायला हवे ?’ हा उपदेश मिळतो, तसेच ‘सनातन प्रभात’मध्ये ‘आम्ही काय करतो ? आणि आम्ही काय करायला हवे ?’ याची दिशा मिळते. ‘सनातन प्रभात’ हे भग्वद्गीतेप्रमाणे दिशादर्शनाचे कार्य करत आहे. ती दिशा घेऊन हिंदुत्वनिष्ठ कार्य करत आहेत. या दिशादर्शनामुळे ध्येय मिळते आणि ध्येयामुळे कार्याची दिशा कधीही डळमळीत होत नाही.

भारताच्या सुरक्षेविषयी सामान्य नागरिकांमध्ये मोठी जागरूकता निर्माण करणारे एकमेव ‘सनातन प्रभात’ ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

‘भारताची सुरक्षा’ हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. अन्य प्रसारमाध्यमांप्रमाणे क्रिकेट, चित्रपट, गुन्हेगारी अशा ‘टीआर्पी’ वाढवणार्‍या गोष्टींपेक्षा ‘सनातन प्रभात’मधून देशाच्या सुरक्षेच्या संदर्भातील सूत्रांना चांगल्या पद्धतीने हाताळले जात आहे, हे कौतुकास्पद आहे. सनातन प्रभातमध्ये प्रत्येक आठवड्यात ‘चीन, पाकिस्तान, अन्य देश आणि भारताची सुरक्षा’ यांविषयी लेख छापून येतात. त्यामध्ये वेगवेगळ्या पैलूंद्वारे देशाच्या सुरक्षेविषयी सामान्य नागरिकांना माहिती मिळते आणि नागरिक जागृत होतात. ‘देशाची सुरक्षा’ केवळ तज्ञ, सैन्य, पोलीस यांच्यापुरती मर्यादित नसून त्याविषयी सामान्य नागरिकांनीही जागरूकतेने सहभाग घेणे आवश्यक झाले आहे. ही जागरूकताच पुढे जाऊन सामान्य नागरिकांना देशासाठी लढणारे सैनिक बनवेल !

हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वेळोवेळी मांडलेल्या भूमिका पोटतिडकीने मांडणारे हिंदुस्थानातील एकमेव दैनिक म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’ ! – आकाश जाधव, बजरंग दल, संयोजक, मिरज

हिंदु धर्मावरील होणारे अन्याय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वेळोवेळी मांडलेल्या भूमिका पोटतिडकीने मांडणारे हिंदुस्थानातील एकमेव दैनिक म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’ होय ! हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या कार्याची नोंद अन्य कुणी घेवो अथवा न घेवो; मात्र ‘सनातन प्रभात’मध्ये ती घेतलीच जाते. हे दैनिक आम्हाला आमचेच एक कुटुंब वाटते !

‘सनातन प्रभात’मधील माहितीनुसार आम्ही संघटनेच्या स्तरावर प्रयत्न करतो ! – डॉ. नीलेश लोणकर, संस्थापक अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर युवा विचार मंच, केडगाव, पुणे.

मी एक तपाहून अधिक कालावधीपासून ‘सनातन प्रभात’चा वाचक आहे. सण, धार्मिक उत्सव हे धर्मशास्त्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या कसे साजरे करावेत ? हे मी ‘सनातन प्रभात’ वाचून शिकलो. धर्महानीचे विविध प्रसंग अंक वाचून समजतात. त्यावरील उपाययोजनांविषयीही माहिती मिळते. त्याप्रमाणे आम्ही संघटनेच्या पातळीवर प्रयत्न करतो.

दैनिक ‘सनातन प्रभात’ आमच्यासाठी ‘पोथी’प्रमाणे प्रासादिक आहे ! – ओंकार शुक्ल, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप सांस्कृतिक आघाडी

दैनिक ‘सनातन प्रभात’ एवढे प्रखर आणि सत्य बाजू मांडणारे दुसरे दैनिक नाही ! दैनिकात अध्यात्म, संस्कृती, राजकारण यांची योग्य आणि सुरेख भाषेत सांगड घातलेली असते. अल्पावधीच ‘सनातन प्रभात’च्या विविध भाषांमधील अनेक आवृत्त्या निघणे, हे ‘सनातन प्रभात’वरील वाचकांचा विश्वास वृद्धींगत होत असल्याचे दर्शवते. या दैनिकासाठी कार्य करणारे संपादक, वार्ताहर ते वितरक यांपर्यंत प्रत्येक जण सेवा म्हणून कार्य करतात, हे विशेष आहे.

दैनिकात वृत्त, तर मांडलेले असतेच; मात्र त्या समवेत चुकीच्या गोष्टींचे खंडण, तसेच त्यावर योग्य दृष्टीकोनही दिलेला असतो. हा आमच्यासारख्यांना पुष्कळ भावतो आणि त्याचा लाभही होतो. दैनिक ‘सनातन प्रभात’ हे आमच्यासाठी ‘पोथी’प्रमाणे प्रासादिक आहे !

‘सनातन प्रभात’ उत्तम कार्य करत असून हे कार्य होणे अत्यावश्यक आहे ! – शरद फडके (वय ८३ वर्षे), फडके स्नेहमंडळ, सांगली.

आमच्या मंडळाच्या वतीने होणार्‍या उपक्रमांना ‘सनातन प्रभात’मधून नियमित प्रसिद्धी देण्यात येते. ‘सनातन प्रभात’ उत्तम कार्य करत असून हे कार्य होणे अत्यावश्यक आहे !