
कुडाळ – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ९ नोव्हेंबरला नवी देहली येथे ‘पद्मश्री पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर येथील ठाकर लोककला जोपासणारे लोककलाकार ‘पद्मश्री’ परशुराम गंगावणे यांचे १३ नोव्हेंबरला कुडाळ येथे आगमन झाले. या वेळी भव्य फेरी काढून, तसेच विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्था आणि नागरिक यांच्या वतीने ‘पद्मश्री’ गंगावणे यांचा सत्कार करण्यात आला. कुडाळ येथे आगमन झाल्यानंतर ‘पद्मश्री’ गंगावणे यांनी शहरातील ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर जिल्हा ठाकर समाज, सिंधुदुर्ग; पिंगुळी ठाकर समाज ग्रामस्थ मंडळ आणि गुढीपूर येथील आदिवासी कला आंगण यांच्या वतीने कुडाळ ते पिंगुळी अशी ढोलताशांच्या गजरात ‘पद्मश्री’ गंगावणे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !