‘मी केले’, ‘मी विनामूल्य देतो’, असे निर्मात्याने कधी म्हटले आहे का ?

अध्यात्माची शिकवण ज्याने घेतली, तोच खरा ज्ञानी ! हे ब्रह्मांड, हे विश्व, हे त्या परमेश्वराची निर्मिती आहे. तो मालक आहे. तो सर्वांनाच सर्व काही म्हणजेच हवा, पाणी, अन्न विनामूल्य देत आहे, तरीपण तो परमात्मा ‘मी केले’, असे कधीही म्हणत नाही. ‘मी निर्माता आहे, मी विनामूल्य देतो’, म्हणून ‘मला मत (महत्त्व) द्या’, असे तो येऊन कधी सांगतो का ? जे ‘मी केले आहे’ असे म्हणतात आणि देवाला विसरतात’, त्यांची प्रत्येकालाच चीड आली पाहिजे. ‘देवाच्या कृपेने झाले, मी केले नाही’, असे कुणीच म्हणतांना दिसत नाही.

देहलीचा हिरो (आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल) आणि बंगालची हिरोईन (ममता बॅनर्जी) गोव्यात येऊन शिक्षितांना मूर्ख बनवत आहेत. मागणारे भिकारी असतात, हे कुणाला सांगावे लागते का ? भिकारी विनामूल्य देऊ शकतो का ? तो विनामूल्य खात असतो. ‘मत’ ही मागायची वस्तू नसते, हेपण सांगायलाच पाहिजे का ? तुम्ही धर्माच्या कि अधर्माच्या बाजूने आहात ? याच्यावरच तुमचा निकाल देव लावत असतो. म्हणून आजपासून म्हणा, ‘मी विनामूल्य खाणार नाही आणि खायला देणार नाही.’

– श्री. श्रीराम खेडेकर, नागेशी, फोंडा, गोवा.