
मालवण – शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा, तसेच हे करत असतांना आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केले.
मालवण तालुका शिवसेना कार्यकारिणीची बैठक
१६ ऑक्टोबरला जानकी मंगल कार्यालय येथे आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करतांना आमदार नाईक म्हणाले, ‘‘शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा रहाणारा पक्ष आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकजुटीने गावागावांत शिवसेनेची संघटना अधिक भक्कम करावी. विभागवार गावागावांत बैठका घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकासकामे जनतेपर्यंत पोचवावीत.’’
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !