(म्हणे) ‘रा.स्व. संघाचे कार्यकर्ते नक्षलवाद्यांप्रमाणे काम करतात ! – छत्तीसगडचे काँग्रेसी मुख्यमंत्री भूपेश बघेल

संघाचे स्वयंसेवक नक्षलवाद्यांप्रमाणे काम करत असते, तर बघेल यांना असे बोलण्याचे धाडसच झाले नसते ! – संपादक

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल व भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकुर

भोपाळ (मध्यप्रदेश) – छत्तीसगडचे रा.स्व. संघाचे लोक वेठबिगार्‍यांप्रमाणे (जुलमाखाली अथवा अनास्थेने, तसेच कोणतेही मोल न घेता काम करणार्‍यांप्रमाणे) आणि नक्षलवाद्यांप्रमाणे काम करतात. राज्यात १५ वर्षांच्या भाजपच्या सरकारच्या काळात कोणतेही विकास काम झाले नाही. आता येथील संघवाल्यांचे काहीही चालत नाही, तर सर्व नागपूरमधून संचालित होते, अशी टीका छत्तीसगडचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले. त्यावर भोपाळमधील भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकुर यांनी संघाचे समर्थन करतांना ‘आज हिंदू आणि भारत देश हे संघामुळेच सुरक्षित आहेत’, असे म्हटले. खासदार प्रज्ञासिंह ठाकुर यांच्या या विधानावर काँग्रेसने टीका करतांना हा भारतीय सैन्याचा अवमान असल्याचे म्हटले आहे.