अयोध्येच्या जवळील गावात ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून होणारा हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न उघड : ४० जण कह्यात

हिंदूंची धार्मिक नगरी असलेल्या अयोध्येच्या परिसरात ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून  असे धाडस करण्यात येते, हे हिंदूंना लज्जास्पद ! उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे, याचा ख्रिस्ती धर्मप्रसारकांना धाक वाटला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक  

घटनास्थळी उपस्थित पोलीस

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथे महामार्गाच्या जवळ असलेल्या एका गावात ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून होत असलेल्या हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न प्रशासनाने पोलिसांसह धाड घालून रोखला. या प्रकरणी ४० जणांना कह्यात घेण्यात आले असून यात महिलांचाही समावेश आहे. या गावातील एका घरामध्ये अनेक जण जमा झाले होते. याची माहिती गावकर्‍यांनी प्रशासनाला दिल्यावर ही धाड घालण्यात आली.